सहावा दिवस 30 / 03 / 2020
सहावा दिवस 30 / 03 / 2020


आज सकाळी घर साफ करताना माझ्या काळात प्रचलित असलेलं कार्यानुभव या विषयाचे पुस्तक सापडले. पुस्तक खूप जुने होते. त्या पुस्तकात अनेक उपक्रम दिले होते. प्रत्येक उपक्रम नजरेखालून घालत होतो. वाचताना मी अगदी लहान मुलाप्रमाणे रमून गेलो. वाचता वाचता मी कागदकाम या विभागात आलो आणि मनाला वाटले की आपण या वस्तू पुन्हा करून पहिल्या तर, मनात हा विचार आला आणि मी पेपरचा कागद घेवून फोटोफ्रेम तयार केली. ती मला छान जमली. नंतर मी कागदाची टोपी तयार केली. खरोखर या सर्व कागदकामात माझा वेळ कसा गेला हे समजलेच नाही.