Yogita Takatrao

Others

2  

Yogita Takatrao

Others

शांती

शांती

4 mins
1.5K


शांतीला स्वतःच्याच भावनांना अतिमहत्त्व द्यायची सवय होती, जिद्दी,हट्टी, स्वतःचंच खरं करणारी, अहंकार ठासून भरलेला, सतत दुसऱ्यांना खाली बघायची सवय,वर टोचुन बोलणं ऐकवून, गोड बोलायला येणारी, म्हणजे असं की समोरच्याला तिचा स्वभाव बुचकळ्यात टाकत असे. इकडच्या बातम्या तिकडे, आणि तिकडच्या इकडे, त्या पण राईचा पर्वत बनवून सांगायची सवय.बऱ्याचं वेळा रंगेहात पकडली गेली होती,पण आपण सापडलो असं कळताच ती,तिचं ब्रह्मास्र बाहेर काढायची, तोंड एवढंस करून, हळू आवाजात, रडून रडून, मी नाही त्यातली, असं सिध्दच करायची आणि समोरच्याला साफ खोटं ठरवून मोकळी व्हायची. अश्या विचित्र स्वभावाची, सगळयांना रडून रडून दाखवून, छोट्या छोट्या शुल्लक गोष्टींच अवडंबर माजवण्यात कोण आसुरी सुख मिळायचे, तिला, कोण जाणे? कोणी काही आपलं गुपित सांगायचे अवकाश, शांती गुपित गावभर करून मोकळी १०१ टक्के! ती एका वरिष्ठ पदावर कार्यरत होती, पण सगळयां स्टाफला उगाचच नमविण्याची खोड एकदा चांगलीच अंगाशी आली तिच्या. तिच्या ऑफिस मध्ये श्रेष्ठा नवीनच आली होती, आपलं काम भलं आणि आपण भलं अशी.आणि सगळयां गोष्टीत नावाप्रमाणेच श्रेष्ठ, कोणाच्या खाजगी प्रकरणांत लक्ष न देणारी,आणि ऊगीचच जाणुन बुजुन त्रास द्यायला आलंच कोणी तिला ,तर त्या व्यक्तीला धडा शिकवायला कमी नाही करायची! अतिशय स्वाभिमानी.अशा हया दोन्ही प्रवृत्ती एकाच ऑफिस मध्ये गुण्यागोविंदाने राहत होत्या पण शांतिला ,तिच्या हून वयाने लहान श्रेष्ठा थोडयाच दिवसांत खटकायला लागली,मग काय शांति लागली मुद्दामच श्रेष्ठाला त्रास द्यायला .तिची कामं व्यवस्थित असताना सुद्धा त्याला नावं ठेवणं, घालून पाडूनच बोलणं, स्वतःचच कौतुक करून घेणं, स्वतःचंच गुणगान गातं रहाणं,पूर्ण स्टाफ समोर विनाकारण, कारणं काढून श्रेष्ठाला हिनवणं. श्रेष्ठाने एवढं सगळं सहन करून एकदाही शांति ला उलट उत्तर दिलं नव्हतं पण एकदा शांति ने श्रेष्ठावर पैशांवरून खोटा आळ घेतला, आता श्रेष्ठाला स्वतःच्या बाजूने लढायची वेळ आली होती,आणि तिच्या सहनशक्तीचा अंतही झाला होता. शांती वयाने आणि औदयाने मोठी म्हणून कुठवर सहन करायचं, तिने तिचा विनाकारण केलेला छळ आणि तिने दिलेला त्रास ,शांति एकप्रकारे मानसिक त्रासच देेत होती श्रेष्ठाला ,पण ती आता शांति ला चोख प्रत्युत्तर देणार होती .

ऑफिसमध्ये श्रेष्ठाला शांति च्या पुर्वाश्रमीच्या आयुष्यातल्या गोष्टींचा छडा लागला,ती एकेक पुरावे गोळा करू लागली,सगळे पुरावे तिने निट जपुन ठेवलेले , तिला ते पुरावे हुकमी एक्का म्हणुन तशी वेळ आल्यावरच वापरायचे होते. एके दिवशी ऑफिसमध्ये जरा स्टाफ कमीच होता,ह्या गोष्टीचा फायदा घेत शांति ने श्रेष्ठाला केबिन मध्ये बोलावलं,"आत येऊ मॅडम?" श्रेष्ठाने केबिन मध्ये डोकावून विचारलं.ये! अहंकारानेच शांति उत्तरली.काही ऑफिसचं काम आहे का मॅडम? माझी सगळीच कामं झाली आहेत श्रेष्ठा म्हणाली. ऑफिसचं नाही श्रेष्ठा,त्याच काय आहे ना,आज पर्यंत कोणी माझ्या समोर ताठ मानेने,नजरेला नजर देऊन बोलण्याची हिम्मत नाही केली म्हटलं तु नवी आहेस तर तुला माझे नियम आणि अटी सांगुया म्हणजे ,मग तु नाही माझ्या प्रमाणे वागलिसं,तर ?पुढचे परिणाम काय होतील? ते ऑफिस स्टाफ सांगेलच तुला! श्रेष्ठाला हे वैचित्र्यपूर्ण बोलणं पटलंच नाही,ती महणाली, मॅडम मी इथे ऑफिसचं काम आणि त्या संबंधित नियम आणि अटी मान्य करायला आले आहे,ना की तुमच्या व्यक्तिगत अटी आणि नियम पाळण्यासाठी आले आहे आणि पगार मला सरकार देत आहे,मी माझा आत्मसन्मान आणि स्वाभिमान सांभाळते आणि ह्या ही पुढे तो तसाच सांभाळून ठेवेन,आणि स्टाफ ने कल्पना दिली होती मला आधीच पण मी चुकीच्या माणसांना भिक घालत नाही! श्रेष्ठा ऽऽऽऽऽऽऽऽऽतुला माहिती नाही तु कोणाशी वैर करते आहेस ते? शांति म्हणाली,हम् ....दयावान हसू दाखवत श्रेष्ठा म्हणाली,मी एका कमकुवत बाईशी बोलतेय जी स्वतःची सत्ता आणि दरारा कायम ठेवण्यासाठी कोणत्याही थराची पातळी गाठू शकते! तु माझी पातळी काढणार?थांब तुला दाखवतेच चांगला इंगा,अगं आत्महत्या करायला भाग पाडलयं मी ,नवरा वैतागून मेला माझा ह्रदय विकाराच्या झटक्यानं आणि सुनेलाही आत्महत्या करायला भाग पाडलंय मी! ती ही मोठी स्वाभिमान स्वाभिमान करायची,गेली ती वर स्वाभिमान घेऊन,जो माझ्या मनासारखं नाही वागणार ,मी त्यांची हीचं दुर्दशा करणार,वाकत नाहीस काय माझ्या पुढ्यात,थांब दाखवते तुला,चांगली अडकवते तुला! असं म्हणुन शांति ने तिच्या टेबलावर ठेवलेल्या औषधाची बाटली हातावर उलटी केली आणि श्रेष्ठाला काही कळायच्या आतच मुठभर गोळ्या तोंडात टाकणार,तेवढ्यात केबिन उघडून ४ पोलिस आले,त्यांनी शांति च्या हातातून गोळ्या हिसकावुन घेतल्या,एका महिला पोलिसाने जोरदार कानशिलात लगावली शांतिच्या! वरिष्ठ पोलिस म्हणाले शांति कडू,यु आर अंडर अरेस्ट ! शांति ने तिचं ब्रम्हास्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण श्रेष्ठा म्हणाली आता चालणार नाही ,तुम्ही मला ओळखलं नाहीत,मी तुमच्या सुनेची लहान बहीण सुजाता,ताईने तुमच्या त्रासाला आणि ढोंगीपणाला कंटाळून १० वर्षां पूर्वी आत्महत्या केली होती, पुरावा नव्हता तेव्हा आणि मी लहान होते पण तेवढ्याचसाठी मी पोलिस ऑफिसर झाले, मनिषा टाक हील जेल मध्ये!ताईने मरणाला कवटाळलं पण ,त्या पुर्वीच तिने एक चिठ्ठी लिहिली होती,अर्थात ती माझ्या हाती लागली ,पण कळलं नाही की काय करावं तेव्हा ,त्या चिठ्ठीत तुमच्या सगळयांच काळ्या प्रतापांची नोंद आहे,तोच ठोस पुरावा माझ्या हाती लागला ,लहान होते पण मोठी होत गेले आणि चिठ्ठीतला मजकुर समजत ,उमजत गेला आणि माझ्या मनातली आग तेवत ,भडकत राहिली ,आज मी ही शांत झाले पूर्णतः,शांत झाले! आज शांति नावाची मोकाट फिरणारी गुन्हेगारी प्रवृत्ती गजाआड होतेय. ताई!तु जिथे कुठे असशील बघ ! बघ !तुझी गुन्हेगार पकडली गेलीय, आज खरी शांति लाभली असेल ना तुझ्या आत्म्याला, ताई ?


Rate this content
Log in