Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

सहा ऋतूंचे सहा सोहळे

सहा ऋतूंचे सहा सोहळे

1 min
650


चैत्र-वैशाख- वसंत ऋतू


 कोकीळ कुजन आम्रवृक्षा वर

फांद्या फांद्या मधूनी मोहर

 उष्ण सुगंधित गंधित वारे

 फुले मोहविती चराचरा रे

खुशाल समजा वसंत आला 

 आनंद देई मना मनाला 

 तनामनावरी मोहर फुलला 

वसंत आला वसंत आला


ज्येष्ठ आषाढ -ग्रीष्म ऋतू


जेव्हा लागती घामाच्या धारा

 आजोबा नेसतात पंचा

 तेव्हा समजायचं की आता

 ग्रीष्मा ने केलाय कब्जा

 आईस्क्रीम ताक सरबत

 वाळ्याचे थंड पाणी 

थंडगार वातानुकुलीत खोलीत

 घेऊ डुलकी खात बिर्याणी


श्रावण--भाद्रपद- वर्षा ऋतू


नभी दाटलेले काळे मेघ

क्षितिजावर विद्युल्लतेची रेघ

मयूर नाचतो फुलवूनी पिसारा

चिंब जाहला आसमंत सारा

सुवास पसरे मृदू गंधाचा

 सोहळा वर्षाच्या आगमनाचा


अश्विन कार्तिक -शरद ऋतू


 जेव्हा येते गुलाबी थंडी

 समजायचे आली शरदाची नांदी 

कोजागिरीला दूध प्यायचे

 रास गरबा खेळायचा

 भक्ती आणि प्रेमाने

 जीवनाचा आनंद लुटायचा


मार्गशीर्ष पौष - हेमंत ऋतू


 हेमंत ऋतूत येते दिवाळी

 ती चराचराचे भाग्य उजळी

 कपडे फटाके रेलचेल मिठाईची

 ती तर राणी सर्व सणांची


माघ फाल्गुन- शिशिर ऋतू


 जेव्हा भरते हुडहुडी

  वारे थंड वाहती

 झाडांना लागते पान गळती 

पांघरायला लागतात

 चादरी दोन

 गोठून जातात काही क्षण

 समजाचे तेव्हा झाले शिशिराची आगमन

 हुरडा पार्टी शेकोटी यांची मजा लुटायची

 हसत-खेळत आनंदात  

 थंडीची मजा लुटायची


सहा ऋतूंचे सहा सोहळे

 पृथ्वीवर भोगी मानवा 

 जगा जगवा आणि जगू द्या

मग नाहीच कशाची वानवा



Rate this content
Log in