Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

सौंदर्य आणि फॅशन

सौंदर्य आणि फॅशन

2 mins
971


"ऊस डोंगा, परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा"

असे संत तुकारामांनी म्हटले आहे. म्हणजे वरच्या रंगाला भुलून न जाता अंतरंग बघा हा त्याचा अर्थ आहे.

 अगदी "मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स" या स्पर्धांमध्ये नुसते सौंदर्य न पाहता त्यांची बुद्धिमत्ता देखील पाहतात.

सौंदर्य आणि फॅशन यांचा म्हटले तर एकमेकाशी काही एक संबंध नाही दोन्ही आपापल्या जागी आहे. आणि म्हटले तर त्याचा संबंध आहे फॅशनमुळे सौंदर्य खुलते तर कधीकधी सौंदर्यामुळे फॅशन . म्हणूनच मोठ्या प्रोडक्स च्या जाहिरातीला सौंदर्यवती घेतात .तसेच कपड्यांच्या फॅशन डिझाईन साठी रँम्पवॉक सारखे फॅशन शो आयोजित केले जातात.


मुळात सौंदर्याचे असे एक कोणते परिमाण नाही . अगदीआपल्या भारतातच दक्षिणेकडे गेले असता सावळ्या रंगाला आणि आखीव रेखीव चेहरा असणाऱ्याला ब्लॅकब्युटी असे म्हटले जाते .याऊलट उर्वरीत उत्तर भारतामध्ये गोरा रंग सडपातळ बांधा आणि लांब केस असे सौंदर्याचे परिमाण आहे. चीनमध्ये सर्वात लहान पाय असणारी सौंदर्यवती, तर आफ्रिकेमध्ये जाडे ओठ आणि काळा रंग याला सौंदर्यवती चे परिमाण मानले जाते. स्पेनमध्ये ब्राऊन कलर सौंदर्य वतीचे परिमाण मानले जाते त्याला लॅटीनोब्युटी असे म्हणतात .पण त्यात काही असे अभिप्रेत नाही की या रंगाच्या माणसाने हे कपडे घालावे किंवा या व्यक्तीने ही फॅशन करू नये. फॅशन ही व्यक्तिसापेक्ष असते ज्याला जे आवडते ते तो वापरतो किंवा तशी फॅशन करतो. फॅशन ही रोटेशन मध्ये पुन्हा पुन्हा येत असते साधारण दहा वीस वर्षांनी तीच फॅशन पुन्हा येते कधीकधी त्यांच्या आयडॉल मुळे मुले मुली तशा प्रकारचे कपडे केसाची स्टाईल करत राहतात. उदाहरणार्थ दिवार सिनेमांमध्ये अमिताभच्या शर्टाचे शेवटचे बटण तुटले होते म्हणून त्यांनी तिथे गाठ मारली पण नंतर कित्येक दिवस ती फॅशन झाली." एक दुजे के लिए" नंतर रती अग्निहोत्री गळ्यातील डिस्को माळ, सरगम पिक्चर नंतर सरगम साडी, सरगम बांगड्या, अगदी लेटेस्ट म्हणजे जान्हवी मंगळसूत्र अशी कितीतरी उदाहरणे देता येतील

"जातीच्या सुंदरांना काहीही शोभते" म्हणजे सुंदर व्यक्तीने कोणतेही कपडे परिधान केले, काहीही फॅशन केली तरी ती छान दिसते याचे उदाहरण खालील कविता

नेत्र गोलातून बाल किरण येती

 नाच तेजाचा तव मुखी करीती

 पाचू माणिक आणखी हिरा मोती

 गडे नेत्रा तव लव न तुळो येती

 काय येथे भूषणे भूषवावे

 विविध वसने वा अधिक शोभवावे 

दान सीमा हो जेथ निसर्गाची काय म्हणती त्या स्थली कृत्रिमाची 


कवी ची मुलगी तिच्या अंगावरती दागिने नाहीत म्हणून इतर मैत्रिणींनी चिडवल्याने रडत येते. त्यावेळी तिची समजूत घालताना , वडील तिला सांगतात की तू मुळातच सुंदर आहेस तुला अशा गोष्टींची गरज नाही


आजकालची फॅशन

पिढ्यानपिढ्या मागची पिढी पुढच्या पिढीच्या फॅशनला नावे ठेवत आलेली आहे सत्तर-ऐंशी वर्षापूर्वी नऊवारी, पन्नास वर्षांपूर्वी सहावारी, नंतर पंजाबी ड्रेस व आता जीन्स पॅन्ट तसेच पुरुषांच्या बाबतीत धोतर, लेंगा, पॅन्ट ,आणि आता जीन्स पॅन्ट असा बदल होत गेलेला आहे परंतु फॅशनच्या नावाखाली फाटलेल्या जीन्स वापरणे, केसांचे चित्रविचित्र आकार करणे हे काही भारतीय संस्कृतीत बसत नाही. आणि मनाला देखील पटत नाही पण म्हणतात ना,

"कालाय तस्मै नमः"


Rate this content
Log in