सायकल
सायकल
शेवंता घरच्या कोपऱ्यात बसून आईवर रुसवेफुगवे काढत होती. मी छानपैकी झोपलेली असताना मला साखर झोपेतून ती जागं करते तेव्हा, किंवा मग 'दात घास' म्हणून पाठीशी लागते तेव्हा, किंवा दोरीच्या उद्या घे म्हणते ,तेव्हा किंवा 'आधी दूध पी' म्हणून ओरडत असते तेव्हा, किंवा तसलं काहीही! पण त्याहूनही जास्त राग तेव्हा येतो जेव्हा ती 'सायकल शीक.. सायकल शीक' असा जप सुरू करते.
माझ्या डोक्यात शंकरराव खरोखर प्रकट झाले तर आई काय करेल ते सगळं चालू झालं. मग ती हात जोडून शंकररावांना म्हणेल की - आमच्या चिऊला सुबुद्धी वगैरे दे, किंवा आमच्या शेवंता वर्गात अव्वल येऊ दे,पहिला नंबर वगैरे येऊ दे, किंवा आमच्या शेवंताला सायकल वगैरे चालवता येऊ दे, किंवा तसलं काहीही!
आई शेवंताच्या समोरच येऊन बसली आणि चालू... "मला साधी भाजी आणायला एवढी पायपीट करावी लागते, त्याचं कुणालाच काही नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून कितीतरी वेळा तरी 'सायकल शीक' म्हणून सांगितलं असेल तुला. एव्हाना शिकली सुद्धा असतीस."
ती काही बोलत नाही हे बघून मग आईचा पारा की काय म्हणतात तो चढला. मग ती अजूनच चिडून बोलली, "आज साध्या कोथिंबीरीच्या जुड्यांसाठी पण मला इतक्या लांब जावं लागलं आणि तुम्ही आपले बसली आहे राणीसारख
े पाय पसरून, परीच्या विश्वात.."
म्हणजे मी भाजी आणावी म्हणून सायकल शिकवतायत तर हे मला. म्हणूनच असणार. मग तर मी मुळीच नाही शिकणार. कारण तिथे ती मावशी मी जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा माझ्या वेण्या जोरात ओढते आणि त्याहूनही म्हणजे मला चिऊताई वगैरे म्हणते. हे म्हणजे तर अतीच! म्हणजे काय? मी मोठा झालोय आता. यावर्षीपासून तर मी शाळेत एकटासुद्धा जाणार आहे. इयत्ता ५वी 'अ'. तर मी हे आईला सांगितलं तर तिचं पुन्हा चालू झालं,
इतक्यातच आईने माझ्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि जवळजवळ किंचाळलीच-
"ऊठ आधी या खुर्चीवरून. एक अक्षर ऐकत नाहीस. श्रीरंगा, इथे ये आणि घेऊन जा हिला आधी खाली. बघतेच कसा शिकत नाही तो सायकल."
"पण माझे पाय पोचत नाहीत गं जमिनीवर." मी अगदी कळवळून बोललो.
"मी आहे की मागे धरायला." दादोजींनी मध्ये चोच खुपसलीच.
"पण तरी पण.. मला.."
"पण नाही नि बीण नाही. जा रे याला घेऊन खाली. पडला तरी चालेल, पण सायकल आली पाहिजे. जा आधी."
मग काय, सपशेल शरणागती! शेवटी आम्हांला जावंच लागलं. आमच्या चाळीच्या बाजूलाच खूप मोठी जागा आहे. दुपारी गाड्या वगैरे नसतात ना म्हणून मोकळी असते ती. तिथे आम्ही येऊन पोचलो. मग दादोजींनी आम्हांस उपदेश करायला सुरूवात केली.