नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

सायकल

सायकल

4 mins
1.5Kगण्या धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपली सायकल चोरीला गेली याची तक्रार देऊ लागला. तिथे बसलेले हवालदार गण्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते, कारण ते आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त होते. त्या हवालदारासमोर एक बाई बसली होती आणि ती रडत रडत तक्रार करीत होती. तिचा तक्रार लिहिणे झाल्यावर हवालदार गण्याकडे वळले आणि म्हणाले, " हे सांग रे बाबा काय झालं ? "

यावर गण्या म्हणाला, "साहेब माझी सायकल चोरीला गेली."

" कुठून गेली चोरीला"

" साहेब, मेन रोड वरून .."

" मेन रोड म्हणजे नेमके कोठे ?"

" देशी दारूचे दुकान ..... "

" अच्छा ! तर तू दारू घ्यायला गेला होतास ? "

"नाही हो, साहेब, तिथे बाजूला एक किराणा दुकान आहे तेथून सामान घ्यायचे होते."

" किती खोटे बोलतोस रे तू, किती वास येतेय तुझ्याजवळ."

" नाही हो साहेब, मी खरे सांगतो मी दारू पियाला गेलो नाही हो, मी गरीब माणूस आहे. माझ्याकडे दुसरा ड्रेस नाही. गेल्या एक महिन्यापासून एकच ड्रेस माझ्या अंगावर आहे."

" काही खोटे नाटे बोलू नको. दारूच्या नशेत तू सायकल कुठे ठेवलास नीट आठवण कर."

" साहेब, मी खरं सांगत आहे, मी तेथेच सायकल ठेवलो. दुकानात सामान घेऊन परत येईपर्यंत सायकल गायब झाली."

" एका मिनिटात सायकल गायब झाली, बाप रे ! " असे म्हणून हवालदार गण्याकडे संशयित नजरेने पाहू लागला. रागाने आपल्या शिपायाला आवाज देऊन " अरे, याची चांगली तपासणी करा रे, यांच्याजवळ काही सापडते काय बघा ! " गण्या पुरता घाबरून गेला भीक नको पण कुत्रा आवर अशी त्याची विचित्र अवस्था झाली. गण्या कळवळून म्हणू लागला, " साहेब माझी सायकल चोरीला गेली त्याचे तक्रार लिहून घ्या अगोदर. माझी काय तपासणी करणार ? माझ्या जवळ काही नाही हो !" तरी देखील शिपायाने गण्याची पूर्ण तपासणी केली, त्याच्याजवळ काही निघाले नसल्याचे शिपायाने सांगितले. तरी देखील हवालदार तक्रार घ्यायला तयारच नव्हते. तेवढ्यात एका चोराला पकडून त्या हवालदारासमोर उपस्थित करण्यात आले. त्याला पकडून आणलेला शिपाई म्हणाला, " साहेब, हा मेन रोड वर सायकल चोरताना पकडला गेलाय." हे ऐकल्यावर गण्याला खूप आनंद झाला आणि पोलीस म्हणाला, " कुठे चोरी करत होता." शिपाई म्हणाला, " मेन रोड वरील देशी दारूच्या दुकानासमोर हा सायकल चोरण्याचा प्रयत्न करीत होता तेंव्हाच काही लोकांनी त्याला पकडले" गण्याला सायकल।सापडण्याची आशेची एक किनार दिसून आली. हवालदाराने दंडुका दाखवून त्याच्याकडून सर्व माहिती काढली असता, नुकतेच त्याने त्याच ठिकाणाहून चार-पाच सायकल चोरले असल्याची कबुली दिली. गण्याला आनंद वाटत होता कारण त्याला त्याची सायकल परत मिळणार होती. थोड्याच वेळात त्याने चोरलेल्या सायकली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यात गाण्यांची देखील सायकल होती. ती सायकल पाहताच तो हवालदार साहेबाना म्हणाला, " साहेब हीच आहे माझी सायकल."

" तुमच्याजवळ पुरावा काय आहे ? ही सायकल तुमची आहे यासाठी." गण्या आत्ता विचार करू लागला. सायकलचे सर्व वर्णन केला परंतु हवालदार मानण्यास तयार होईना. हवालदार म्हणाले, " सायकलचे कागदपत्र आणा आणि सायकल घेऊन जा." गण्याला आत्ता प्रश्न पडला की, सायकलचे कागदपत्र कुठून आणावे. ती बाबाची सायकल होती, घेऊन आज जवळपास 15-20 वर्षाचा काळ उलटला होता. सायकल विकत घेतलेले कागद बाबाला मागावे तर बाबा कारण विचारणार ? बरं त्यांनी देखील कागद आजपर्यंत जपून ठेवणे शक्य होते काय ? सायकल विना घरी गेलो तर बाबा रागावणार, काय करायचे ? म्हणून त्याने साहेबाला खूप विनंती केली. त्याच्या पाया देखील पडला पण काही उपयोग झाला नाही. चोरीला गेलेली सायकल परत दिसायला लागली मात्र गण्याला काही परत मिळाली नाही. कदाचित सायकल ला इतर गाड्यासारखे क्रमांक देण्यात आले असते तर माझी सायकल मला परत मिळविता आली असती. गण्या हताश होऊन आपल्या घरी परत चालला असतांना त्याचा मित्र रशीद आणि जॉन तेथून जात होते. त्यांनी गण्याला निराश पाहून विचारतात, " क्या हुआ गण्या ? "

" काही नाही रे, माझी सायकल चोरीला गेली. म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथे एका चोराने चोरलेल्या सायकली आणल्या होत्या त्यात माझी सायकल पण होती. त्या पोलिसांना माझी ती सायकल मला परत दे म्हणले तर देत नाहीत. "

यावर जॉन म्हणतो " वाय ? का देत नाहीत ?"

" उसके मा की, चल देखेगे, कैसे नाही देगा "

" नाही यार, तो सायकलची पावती आण म्हणतोय, कुठं आहे त्या सायकलची पावती, कोणाला माहीत"

" ऐसा है क्या .....हं ..... हं......" 

रशीद थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो, " तेरे पास सौ रुपये है क्या ? मै अभी सायकल छुडा के लाता हुं "

" माझ्याजवळ कुठले शंभर रु. तरी दुकानातून उरलेले काही असतील...." म्हणून गण्या आपले खिसे तपासतो त्याला वीस रुपये मिळतात. जॉन जवळ तीस रुपये निघतात. रशीद जवळ पंधरा रु निघतात असे एकूण 65 रुपये होतात. काय करावं या विचारात ते परत पोलीस स्टेशनकडे जातात. रस्त्यात त्यांना फिरदोस नावाचा मित्र भेटतो. त्याला सर्व कहाणी सांगतात. त्यावर तो त्याच्याजवळ असलेले तीस रुपये देतो. अश्याप्रकारे शंभराला फक्त पाचच रुपये कमी असतात. तरी ही ते पोलीसाजवळ जातात. गण्या दुरूनच त्याची सायकल दाखवितो. रशीद बोलायला खूप हुशार, तो थेट त्या पोलिसाजवळ जातो आणि सायकल चोरीला गेल्याचे सांगतो आणि गण्याची सायकल दाखवितो. त्याला देखील साहेब तेच उत्तर देतात, पावती आणून दाखव आणि सायकल घेऊन जा. यावर रशीद हळूच त्या पोलीस वाल्याच्या कानात काही तर कुजबुज करतो आणि खिशात हात घालून सर्व पैसा त्याच्या हातात देतो. गरीब पे दया करो साब असे जाता जाता म्हणतो. जा तेरा सायकल लेके जा. असे म्हणतात रशीद गण्याची सायकल काढतो आणि बाहेर पडणार इतक्यात तो पोलीसवाला आवाज देतो, अभे, इसमे पांच कम है, रुक जा. तो गण्याला सायकल देतो आणि बाहेर जाण्यास सांगतो आणि म्हणतो, हां, साब, अगली बार पांच जादा दे दुंगा साब. अच्छा ठीक है, जा. असे म्हणतात जॉन, रशीद आणि गण्या हसत खेळत घराकडे निघाले. जाता जाता गण्याने दोघांचे मनःपूर्वक आभार मानले. 


Rate this content
Log in