Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

सामंजस्यता

सामंजस्यता

2 mins
231


   सामंजस्य म्हणजेच समज ,ही लहान थोर वृद्ध सर्वांमध्ये हवी. आजकाल सामंजस्याची भावना पाहायला मिळत नाही .याची अनेक उदाहरणं बघायला मिळतील .

  अगदी परवा माझ्या वर्गात जवळजवळ 33 वर्षाने एक वेगळा अनुभव आला मला मुलांना छान समजून सांगायला आवडते . मुलं माझं ऐकतात सुद्धा .मुलं मधल्या सुट्टी मध्ये जेवण करताना डबे खाताना इतरांच्या डब्यात काय आहे हे पाहतात आणि आवडणारा पदार्थ डब्यात हात घालून खातात .काही मुलांना हे आवडते ,तर काही मुलांना हे आवडत नाही .काही मुलं स्वतःचा डबा इतरांबरोबर शेअर करत नाहीत. तर काही मुलं आपला डबा सोडून इतरांचा डबा खातात. हा पण अनुभव आला आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे, की वर्गातील एका मुलीचा डबा माझ्याच वर्गातील एका मुलाचा भाऊ खात होता. मुलीला डब्यात हात घातलेला आवडत नव्हता .पण हा छोटा असल्या कारणाने त्याला हे समजत नसेल. त्याची आई तर खरं छान डबे द्यायची. व्यवस्थित राहणीमान त्यांचा डबा व्यवस्थित असतो. ठीक आहे माझ्या कानावर ही घटना आली तेव्हा मी लगेचच ॲक्शन घेऊन छोटूला समजावले.   त्याच्या भावाला पण समजावून सांगितले .वर्गातील मुलांना आपण आपले जसे शैक्षणिक साहित्य शेअर करतो तसेच डबा सुद्धा शेअर करावा हे शिकवले. दुसऱ्या दिवशी मुलांचा गोंधळ खूप झाला .वर्गात मधल्या सुट्टीमध्ये मुलं सांगायला आली .मी वर्गात गेले वर्गात जाऊन गोंधळ का झाला हे पाहिले. तर अगदी साध्या भाषेतल्या शिव्या एक दोन मुलांनी वर्गात दिल्या होत्या. मी त्यांना शिक्षा केली नाही पण गौतम बुद्धांची "तुझं तुझ्या जवळ ठेवमला नको". ही गोष्ट सांगितली म्हणजे बुद्धांना एका माणसाने शिव्या दिल्या असता बुद्ध म्हणाले त्यात तुला ठेव मला त्या नकोत. याचा अर्थ समजावून सांगितला मुलं खुश झाली त्यांना सांगितले शिव्या जरी दिल्या कोणी तरी त्या आपण मनावर घ्यायचा नाहीत. शिव्या आपल्याला लागतच नाहीत पण जर दगड मारला तर आपल्याला इजा होऊ शकते. पण शिवी दिल्याने आपल्याला इजा होत नाही आपलं मन दुखावल्या जातं, पण समोरचा वागला तसा आपण वागून उपयोग नाही .हे समजावून सांगितले पण दुसऱ्या दिवशी त्या मुलीची आई आली वर्गातल्या मुलांना बोलायला लागली .मी त्यांना समजावून सांगितले पण प्रथमच त्यांनी माझे ऐकले नाही. बोलल्या काही नाहीत पण ऐकले नाही .मुलांना बोलता बोलता त्या जरा चिडल्या. मी त्यांना शांत केले. समजावून सांगितले.      सामंजस्याचा पत्ताच नव्हता. दुसऱ्या दिवशी परत आल्या उशिरा आल्या. मुलांकडे चौकशी केली पण हे त्यांचे वागणे मला पटले नाही. अशी हल्लीची पिढी सामंजस्यता कमी असणारी आहे आपले मूल ते आपलेच मूल, लोकांचे ते कार्टे अशी म्हण आहे ना, "माझा तो बाब्या लोकांचं ते कार्ट" हल्ली प्रत्येक क्षेत्रातच सामंजस्याचा अभाव आहे. आपल्याला वारंवार त्या दृष्टीस पडतं ऐकायला मिळतं आपण पाहतो, म्हणून मानवा जन्माला आला आहेस तर जरा सामंजस्याने वागूया असे मला वाटते.

   हल्ली बाजारात,सरकारी कचेरीत,नोकरीमधे,बसमधे,अशी किती ठिकाणी सांगावित की तिथे समंजसपणाचा अभाव आहे....

  मानवा वाग जरा समजूतीने

  आपला तो बाब्या ,लोकाचं ते कार्ट

  नको मनात आणूस कधीही मानवा...


Rate this content
Log in