Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Vasudha Naik

Others


2.0  

Vasudha Naik

Others


साहसी अमर

साहसी अमर

1 min 43 1 min 43

   जयपूर या ठिकाणी दुसर्‍या मजल्यावरच्या फ्लॅटमधे अमरचे आई ,बाबा,छोटी मिनू व अमर असे छोटे कुटुंब राहत होते.

   अमर आठ वर्षाचा चौथी शिकत असणारा मुलगा व मिनू ही अवघी अकरा महिन्यांची सानुली होती.

   बाबा दिवसभर कामात व्यस्त तर आई मिनूचे करण्यात व घरकामात पार दमून जात असे.अमर जरा कोरोना मुळे शाळा नाही तर आईच्या कामात मदत थोडी करत असे.

  जयपूरला माकडांची संख्या जास्त.अगदी घर उघडे राहिले तरी घरात यायला ती कमी करत नाहीत एवढा सुळसुळाट असे.

   मिनू आता वाॅकरमधे उभे राहून मस्त सर्व खोल्यांमधून फेरफटका मारत असे.  

   अमर तिच्याकडे मधून अधून लक्ष देत असे.तिने त्रास दिला की आईला सांगत असे.

  एके दिवशी आई दोघांना घरात ठेवून अर्ध्यातासासाठी भाजी आणायणा म्हणून गेली.जाताना एरवी बाहेरून दार लावायची त्या दिवशी विसरली.

   ती पायर्‍या उतरली .अन इकडे मिनू वाॅकरमधून दाराबाहेर आली.अमरचे लक्ष चुकवून ती पुढे गेली.अमरने आवाज देताच ती जोरातच धावायला लागली.तितक्यात एक छोटे माकड आले नि मिनूचे वाॅकर ओढायला लागले.

   हे पाहून अमर खूप घाबरला ओरडू लागला पण शेजारचेही घरी नव्हते.माकडाचे ओढणे चालूच होते.आता पायर्‍या अगदी जवळ आल्या होत्या हे अमरला दिसताच तो जीवाच्या आकांताने ओरडला व वाॅकर घाबरतच ओढू लागला.

    तो पर्यंत आई पण आली तिने माकडाला हिसकावून लावले व मिनूला पटकन कवटाळले.अमरला जवळ घेतले.

  अशा रितीने अमरचे साहस पाहून आईला कौतुक वाटले.व बाबांनी त्याला बक्षीस दिले.

  असा हा साहसी अमर होता म्हणून मिनू पायर्‍यावरून पडायची वाचली.


Rate this content
Log in