Avanee Gokhale-Tekale

Others

3  

Avanee Gokhale-Tekale

Others

S for stomach..

S for stomach..

2 mins
489


हॉस्पिटल मध्ये वाढत चाललेली patients ची गर्दी.. आणि मुलीच्या शाळेची PTM ची जवळ येत चाललेली वेळ.. राकेश आणि मिताली सगळ्या आघाड्यांवर लढत होते.. छोटुशी वेदांगी आज तोंड बारीक करून बसली होती.. तिच्या शाळेतून तक्रार आली होती.. म्हणजे तिला काहीच कळलं नव्हतं तिचं काय चुकलं ते.. पण आई बाबांना आज शाळेत बोलावलं आहे.. आणि बाई त्यांना ओरडणार आहेत असं काहीतरी तिला समजलं होतं.. 

राकेश आणि मिताली दोघे MD gold medallist.. जेमतेम परिस्थितीत हिम्मत, जिद्द आणि हुशारी याच्या जोरावर.. कधी part time नोकरी करत.. पडेल ते काम कष्ट करत दोघांनी शिक्षण पूर्ण केले.. मग कुठल्या डॉक्टर च्या हाताखाली काम कर, कुठे रात्रपाळी कर.. असे दिवस रात्र काम करून त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल उभे केले होते.. छोट्या वेदांगी ला ३ महिन्याची घेऊन मिताली ने OPD मधले patients तपासायला सुरवात केली होती..patients ला तपासत मध्येच वेदाला दूध पाजत मिताली क्लिनिक सांभाळत होती.. कधी सिस्टर्स येऊन खेळवायच्या तर कधी ओळखीचे patients सुद्धा नंबर लागेपर्यंत तिला कडेवर फिरवायचे.. असे करत वेदांगी हळूहळू मोठी होत होती.. ३ वर्षाची वेदांगी आता nursery मध्ये जायला लागली होती.. आज तिची शाळेची PTM होती त्यासाठीच लगबग चालू होती सगळी.. 

आत गेले तर टीचर वाटच बघत होत्या.. त्या म्हणे अहो काय तुम्ही वेदांगी चे आई बाबा.. थोडे लक्ष द्या आपल्या मुलीकडे.. जरा a for apple, b for ball शिकवा हो शेजारी बसून.. तिला येत नसेल तर ट्युशन का नाही लावत तुम्ही? तिला किती लिहायला वाचायला येत आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्ही..

या सगळ्या प्रश्नांच्या भडिमारामुळे राकेश आणि मिताली ला आपण एकदम "ढ" पालक असल्यासारखे वाटायला लागले होते.. आपण खरंच वेळ देऊ शकत नाही तिला याची खंत वाटायला लागली होती .. पण अजूनही त्यांना कळतच नव्हतं की नेमकं काय झालंय? लहान तर आहे ती.. खेड्यातल्या शाळेत शिकून आपण आलोच की इथपर्यंत ट्युशन वगैरे न लावता..

मिताली ने घाबरून विचारलं शेवटी टीचर ला.. अहो काहीच कळत नाहीये का तिला तुम्ही शिकवलेलं? तर टीचर चिडून म्हणाल्या काय तुमची वेदांगी.. काहीच समजत नाही तिला.. S for? असं विचारल्यावर sun म्हणायचं सोडून stomach म्हणते ती.. आता मात्र राकेश आणि मिताली ला हसावं का रडावं तेच कळेना.. अहो पण stomach मध्ये पण S असतोच की.. चुकीचं कसं काय असेल ते.. तर टीचर सांगत होत्या त्यावर.. अहो syllabus मध्ये sun आहे ना.. तुम्हाला तिला शिकवता येत नसेल तर ट्युशन लावा तुम्ही तिला..

आज खूप वर्ष झाली या गोष्टीला.. वेदांगी च्या आई बाबांना काही जमलं नाही तिला ट्युशन वगैरे लावायला.. जमेल तसं तेच शिकवत राहिले तिला जाता येता.. बाकी काही गोष्टी ती न कळत शिकली आजूबाजूला बघून.. आज वेदांगी IVF specialist आहे.. आणि आई बाबांचं हॉस्पिटल तिने अजून मोठ्या प्रमाणात वाढवले आहे.. पण अजून तिला S for stomach कसं चुकीचं आहे हे मात्र समजलं नाही.. 


Rate this content
Log in