रमाची पाटी
रमाची पाटी
रमा एक कचरा वेचणारी दहा वर्षाची मुलगी. घरात अठराविश्व दारिद्र्य .
एकदा ती कचराकुंडीजवळ येते.तर तिला रडण्याचा आवाज येतो.ती पाहते तर एक पाटी रडत होती. पाटीकडे पाहते रमा आणि पटकन कचर्यातून तिला बाजूला करते.
पाटी हसते तिला म्हणते "बघ न ताई मला रूद्रने फेकून दिले. त्याला नवीन पाटी आणली न." रमा म्हणते"हो,का? चल तू माझ्या घरी मी तुला जवळ ठेवीन."
रमा पाटीला घरी आणते..तिला स्वच्छ करते.रमाला शिक्षण घेता आले नाही हे तिच्या मनाला खूप लागत होते.तिच्या एवढी मुले शाळेत जात होती पण घरच्या परिस्थितीमुळे तिला शाळेत जाता येत नव्हते.
ती दुकानदाराकडे जाते पाटीवरची पेन्सिल मागते.पण तिच्याकडे तेवढेही पैसे नसतात. दुकानदार तिला पेन्सिल बाॅक्स फुकट देतो. रमा तू शिक मोठी हो बेटा. जवळच एक पुजारी सर उभे असतात.त्यांना हिचे कौतुक वाटते.तिला नाव विचारतात.व विचारतात" बेटा तू काय करते?"ति सांगते ती काय करते,घरची परिस्थिती सांगते.
पुजारी सर तिला सांगतात "तू रोज सकाळी साडेसहा वाजता तुझ्या घराजवळ असणार्या शाळेत ये ,मी तुला शाळा भरण्याआधी शिकवतो.तुझी खूप इच्छा आहे न."
रमा खूश होते.दुसर्या दिवशी
सकाळी लवकर
उठते. आवरते आणि शाळेत जाते.
साधारण तीन महिन्यात रमा लिहायला वाचायला शिकते.
काही दिवसांनी ती एक ,एक शालेय परीक्षा देत,देत दहावी करते.एकीकडे घरातील जबाबदारी पार पण पाडत होती.
असे करत ,करत रमा कलेक्टर होती.नावारूपाला येती.तिची घरची परिस्थिती चांगली होते.
ती पुजारी सर असलेल्या शाळेत येते.सर आता रिटार्यड झाले होते.
रमाचा त्या शाळेत गावात छान सत्कार होतो.ती सरांच्या घरी जाते.सर काॅटवर बसलेले असतात.रमा घरात जाते.सरांना बोलते "सर,मला ओळखलत का?" सर तिच्याकडे निरखून पाहतात.आणि आश्चर्याने जवळ जवळ ओरडतातच..."रमा,तू"
रमा खूश होवून सरांच्या पाया पडते.ज्यांच्यामुळे ती घडली त्यांना मनापासून नतमस्तक होते.
सरांना पण खूप आनंद होतो.आज रमा कुठल्या कुठे पोहोचली होती.
सर तिला एक छानसे पेन बक्षिस देतात.
रमा घराबाहेर पडते. तिची पाटी तिच्यासोबतच असते.रमा पाटीला सतत जवळ ठेवायची.पाटी तिच्याकडे पाहून सतत हसायची....
(मी ही कथा काल वर्गात सांगितली.मुलांनी आपली पाटी स्वच्छ करून जरा कुरवाळली.याचा मला आनंद झाला)