Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

रेशमाच्या रेघांनी

रेशमाच्या रेघांनी

3 mins
63


रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी काढिला

हात नगा लावू माझ्या साडीला!

नवी कोरी साडी लाखमोलाची

भरली मी नक्षी फूलवेलाची

गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला!

जात होते वाटंनं मी तोऱ्यात

अवचित आला माझ्या होऱ्यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?

हात नगा लावू माझ्या साडीला!

भीड काही ठेवा आल्यागेल्याची

मुरवत राखा दहा डोळ्यांची

काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला!


1963 साली " मराठा तितुका मेळवावा"

 या सिनेमातील हे गाणे. आशा ताईंनी आपल्या शैलीत गायलेले आहे. म्हटलं तर ही लावणी आहे. म्हटलं तर हे गीत आहे. आणि या गीताचा उगम मोठा मजेशीर झालेला आहे. 


एकदा लता मंगेशकर यांच्या घरी हृदयनाथ, शांता शेळके, स्वतः लताबाई, आशा भोसले ,अशी मैफिल जमलेली होती. आणि हृदय नाथांना नेहमी जेवण करून हात धुतल्यानंतर ते भारती ताईंच्या पदराला पुसण्याची सवय होती. 

असेच त्या दिवशी गप्पा आणि जेवण असा कार्यक्रम पार पडल्यानंतर, हात धुतल्यावर हृदयनाथ भारती मंगेशकर म्हणजेच आपल्या पत्नीच्या साडीच्या पदराला हात पुसण्यासाठी आले. 


 साडी चांगली आहे, आणि इतक्या लोकांसमोर असा त्यांनी हात पुसू नये, 

हा विचार करून भारती मंगेशकर घरातल्या घरात टेबल भोवती गोल गोल फिरू लागल्या.

आणि पदराला हात पुसायचाच या हट्टाने हृदयनाथ त्यांच्या मागे पळू लागले. आणि अशा परिस्थिती मधून, या सिच्युएशन ला शांताबाई शेळके यांना वरील गीत सुचलेले आहे. 


पहिलेच कडवे किती छान वाटते


 रेशमाच्या रेघांनी

 लाल काळया धाग्यांनी

 कर्नाटकी कशिदा मी काढीला

 हात नका लावू माझ्या साडीला. 


त्या काळामध्ये पैठणी ही पिढ्यानपिढ्या वापरली जायची. आजे सासू ची पैठणी नातसून नेसायची. त्यामुळे ती साडी लाख-मोलाची तर वाटतच असेल, अशी माझी ही लाख-मोलाची साडी आहे. तिच्या पदरावरती राघू मोर आहेत. अशा आमच्या सुंदर साडीला तुम्ही हात लावू नका. 

थोडक्यात लाल काळया धाग्यांनी ची पैठणी किंवा चंद्रकळा म्हटलं तरी हरकत नाही. 


तर दुसर कडव आहे


 जात होते वाटेनं मी

 तोर्‍यात मी तोर्‍यात

 अवचित आला माझ्या

 होर्‍यात जी होर्‍यात 

तुम्ही माझ्या पदराचा 

शेव का हो ओढीला


 म्हणजे अशी ही नवी कोरी साडी घालून रस्त्याने मोठ्या टेचात ही मुलगी चालली होती. तोऱ्यामध्ये चालली होती .

हा अगदी साधा सरळ  मनुष्यस्वभाव आहे. 

किंवा त्यातल्या त्यात जास्त करून स्त्रियांचा स्वभाव आहे. 

की एखादी नवीन कोरी साडी नेसली की मग सगळ्यांनी ती पहावी, आपलं कौतुक करावं, हा भाव त्याच्यामध्ये असतो. आणि म्हणून ती रस्त्याने मोठ्या तोऱ्यात चालली होती. 

तेवढ्यात तिच्या मनीचा जो कोण आहे ,तो अचानक तिच्यावर होऱ्यामध्ये समोर आला .

इथे तोऱ्यामध्ये आणि होऱ्या मध्ये असं मोठं सुंदर यमक जुळवलेल आहे.


 होऱ्यात म्हणजे 

"आला ना आता, माझ्या काह्यात"

 कींवा" अब आया उंट पहाड के नीचे"

 असा काहीसा भाव त्याच्यामध्ये आहे. 

तर त्याला , त्या माणसाला काही राहवत नाही. 

तर जाता जाता हळूच तिच्या साडीचा पदर ओढतो. 

ती म्हणते की तुम्ही असा माझ्या साडीचा पदर चार लोकांमध्ये का ओढला? 


त्यानंतर तिसरं कडव आहे


 भीड काही ठेवा

 आल्या गेल्याची

 मुरवत राखा दहा

 डोळ्यांची 

काय म्हनू बाई बाई 

 काय म्हणू बाई बाई

 तुमच्या या खोडीला

 हात नगा लावू

 माझ्या साडीला


 ह्यामध्ये एक निसर्गदत्त भावना, की जेव्हा ही तरुण सुंदर मुलगी, काळी चंद्रकळा कींवा राघू मोर असणारी पैठणी नेसून रस्त्याने चाललेली असते. ती पण अशी तोऱ्यात, म्हणजे ठुमकत ठुमकत चाललेली असते. 

तेव्हा निश्चितच तिला दहा डोळे निरखत असतात. आणि अशावेळी या तिच्या प्रियकराने तिचा पदर ओढला तर तो निश्चितच सगळ्यांनी पाहिलेला असेल. 

आणि याचा गाव भर बभ्रा, बोभाटा होईल. 

म्हणून ती त्याला रागे भरते. 


काय तरी त्या बघणाऱ्या दहा जणांची मुर्वत राखा.


 त्याची ती खोडी तिला आवडते देखील. 

परंतु ती लटक्या रागाने म्हणते

 काय करू बाई बाई 

तुमच्या या खोडीला


 ह्या एका वाक्यामध्ये अनेक अर्थ असतात. 

एक तर तुमची खोडी मला आवडली आहे. 

दुसरी गोष्ट दहा माणसात तुम्ही असं वागता लोक काय म्हणतील? 

या तुमच्या खोडीला मी काय म्हणू ?

असंही ती कृतकोपाने म्हणते. 

आणि या नोट वरती लावणी समाप्त होते. 


प्रत्यक्षात लावणी मराठा तितुका मेळवावा या सिनेमातील असून थोडक्यात शिवाजी महाराजांचा काळ, 

मराठ्यांच्या सदरेवर किंवा फडावर होणारी लावणी असे आहे. 


Rate this content
Log in