Rohan Bendre

Children Stories Others Children

3  

Rohan Bendre

Children Stories Others Children

राजेश काका आणि वीजचोर

राजेश काका आणि वीजचोर

2 mins
146


अनील व सुनील मस्तीखोर किशोर मुले होती. कसं पण करून धमाल करायची हेच त्यांचे लक्ष्य होते.

सुनील म्हणाला.

" आनंद घेऊन झाला आहे खूप वेळ.

 लोकांना त्रास देऊन चालू करूया आपला क्रूर खेळ. "


सुनील म्हणाला.

" लोकांना त्रास देऊन घेऊया आनंद

 आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांना त्रास देणे हाच आपला छंद. "

सुनील म्हणाला.

" कुठल्या प्रकारे लोकांना आनंद येण्यास बनू शकतो आपण अडथळा.

 जरा समजावशील का मला. "

अनील म्हणाला.

" लोकांचा विजपुरवठा अडवून जोपासुया आपली आवड.

 आणि अश्या प्रकारे बनवूया त्यांचे जीवन अवघड. "

 सुनील व अनील वीज चोरून स्वतःसाठी वापरत.

म्हणून शाळा, रुग्णालय आणि इतर संस्थाना वीजपुरवठा कमी पडू लागला.

गावकरी फार काळजीत होते.

एक गावकरी म्हणाला.

" जर का वीज पुरवठा कमी रहायला लागेल.

 तर माझ्या मुलांना शिकलेले बघायचे स्वप्न अपूर्णच असेल. "

दुसऱ्या गावकरीनी त्याची व्यथा मांडली.

" मेहनत करून माझ्या कुटुंबियांचे पालण पोषण करणे झाले आहे कठीण काम.

त्रासात आहे मी जाम."

एक गावकरी म्हणाला.

" माझ्या आईला आहे उपचाराची आवश्यकता.

 म्हणूनच रुग्णालयात विजपुरवठा असण्याची आहे अत्यावश्यकता. "

त्या गावात राजेश काका नावाचे फारच हुशार गृहस्थ होते.

ते म्हणाले.

"तुम्हाला होणाऱ्या त्रासाची मला आहे कल्पना.

 पण अस्या परिस्थितीत एकत्रित राहुन द्या एकता ची प्रस्तावना."

राजेश काकांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी सर्वाना गाव रिकामं करायला सांगितले.

सुनील दुसऱ्यादिवशी फार आनंदी झाला.

" सर्व गाव झाले आहे रिकामं व शांत. "

अनील म्हणाला.

" अता चहुकडे आपलेच राज्य कारण अपल्याला मिळाला आहे एकांत. "

राजेशकाकांनी ते संभाषणाचे स्थिरचित्र बनवून पोलिसाना सूचित केले.

राजेश काका म्हणाले.

" अता तुरुंगात बसा निवांत.

 वाईट कराल तर होइल असाच अंत. "

मुंबईत वीजचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा गुन्ह्याविरूद्ध आपला आवाज बुलंद करा.


Rate this content
Log in