The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पुस्तक परीक्षण

पुस्तक परीक्षण

1 min
1.1K


   डाॅ. रमा मराठे यांनी लेखन केलेले "ब्रेम प्रोग्रॅमिंग" हे पुस्तक मला खूप भावले.कारण यात आपणजसे विचार करतो,तसेच होते.मग आपणआपला ब्रेन प्रोग्रॅमिंगच असा करायचा की हवे ते साध्य कसे करता येते .हे या पुस्तकात समजावून सांगितलेआहे.

 

आपलं मन आपल्याच हातात असत.आपल्या जीवनातील अनुभवांना आपणच जबाबदार असतो.आपणचआपल भविष्य घडवतो. यावर खूप छान लेखन केले आहे.

  हे प्रोग्रॅमिंग कस होतं? प्रत्येक माणूस त्याच्या ब्रेनशी सुसंगत वागतो.तो विसंगत वागूच शकत नाही.हे खर अथवा खोटं असू शकत.हे परिस्थितीला पूरक असेलच असे नाही.हे छान उदा..देवून स्पष्ट केले आहे. हे ब्रेन प्रोग्रॅमिंग बदलतं तेव्हा खरचच चमत्कार घडतात.जीवन नक्कीच १८० डिग्रीने बदलते. आपला आपणाशी सुसंवाद म्हणजे ब्रेन प्रोग्रॅमिंग.. यामुळे असाध्य ते साध्य होण्यास मदत होते,विज्ञानातील अशी अनेक उदा..देवून स्पष्ट केले आहे.

   

आपला मेंदू म्हणजे अफलातून संगणक आहे.यात प्रत्येक कामासाठी एक प्रोग्रॅम फाईल असते.पाॅझिटिव्ह वर निगेटिव्ह विचार कुरघोडी लवकर करतात.या साठी हे निगेटिव्ह विचारांचे प्रोग्रॅमिंगबाजूलाहटवून पाॅझिटिव्ह प्रोग्रॅमिंग वर कूरघोडी करता यायला हवी. रोजच आपण 'हिप्नोटाइज' कसे होतो हे छान समजून दिले आहे. 'तूच आहेतुझ्या जीवनाचा शिल्पकार' या उक्तीप्रमाणे या पुस्तकात आपले विचारच कसे घातक असतात, तेच कसे चांगले होवू शकतात हे उत्तम सोदाहरण सांगितले आहे. त्यामुळे आपण जगात वावरताना कसे वागलो पाहिजे यातून समज मिळते आणि हो छान विचारांची मशागत करण्यास खूप मदत होते. प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे.


Rate this content
Log in