Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

पुणे शहर

पुणे शहर

1 min
464


 पुणे तिथे काय उणे....या उक्तीप्रमाणे खरच पुण्यात कशाचीच कमतरता नाही.

     पुणे हे प्रेक्षणिय स्थळ आहे,ऐतिहासिक स्थळ आहे,जुनी मंरीरे आहेत, जुनेवाडे पाहण्यासारखे आहेत. बाळ गंगाधर टिळक,ना.गोखले,आगरकर,म.फुले अशा थोर व्यक्ती पुण्यातील कार्य काय वर्णाव मी पामराने. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे.

   आगाखान पॅलेस इथे कस्तुरबा गांधी,म.गांधी यांनी वापरलेल्या वस्तू पाहायला मिळतात.

   केळकर संग्रहालयमधेअनेक जुन्या वस्तू पाहायला मिळतात.

   आदिवासी संग्रहालयामधे आदिवासिंच्या जमातींचा उल्लेख, त्यांनी वापरातील वस्तू पाहायला मिळतात.

   संभाजी पार्क नव्या स्वरूपात मिळते. तेथे मत्स्यालय छान आहे. मुलांना गड किल्ले यांच्या माहिती होण्यासाठी त्याची प्रतिकृती आहे.खेळायला मोकळी जागा आहे.

  सारसबाग पूर्वीचे तळ्यातला गणपती...गणपतीचे प्रसिद्ध मंदीर आहे.इजूबाजूला तळं आहे तळ्यात छान कमळ आहेत. नारळाची मोठी झाडी, हरित तृणांकृराने सजवलेले मैदान. छान वाटते येथे फिरायला.

शिवाय तिथे भेळ ,पाणीपुरी, पावभाजी, कॉफी इ. स्टाॅल लागलेले असतात. मस्त फिरून खाऊन पिऊन घरी यायचे.

   शनिवार वाडा आहे ..पेशवाईचे वैभव इथे पाहायला मिळते. हल्ली या ठिकाणी अनेक सांस्कृतीक कार्यक्रम होतात.

  त्याच्या समोरच लाल महाल आहे. जिजाई अन शिवबांची आठवण करून देणारा हा देखणा महाल त्यांची साक्ष म्हणून पाय रोवून उभा आहे. तेथे शिवराय,जिजाईंची वस्त्रे पाहायला मिळतात.त्याबरोबर शिवरायांची शस्त्रे पाहायला मिळतात. आणि हा लाल महाल पाहाताना "शायिस्तेखानाची फजिती" हा चौथीतील पाठ आठवल्या शिवाय राहत नाही.

   पुण्यात गणपती,मारूती मंदीरे अनेक आहेत. पुण्याजवळच सिंहगड आहे .

ते ही पाहायला खूप दूरून लोक येतात. हे ही अतीसुरेख प्रेक्षणिय स्थळ आहै.

  नुकताच "तानाजी" या सिनेमाचे शुटींग येथेच झालेय.

  किती आणि काय सांगू पुण्याच्या ठिकाणांची

नावे? या पुण्यात आणि पाहाआपल्या नयनांनी पुण्याचे वैभव..


Rate this content
Log in