प्रतिबिंब..
प्रतिबिंब..


तो दोन चेहरे बघत मोठा झाला.. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आई.. आणि Air Force चा युनिफॉर्म दिमाखात मिरवणारा फोटोमधला बाप.. आज संस्कार यशस्वी झाले होते.. तोच युनिफॉर्म आज स्वतः अंगावर घालताना पहिल्यांदा त्याला वडिलांच्या कुशीत शिरल्यासारखे वाटत होते.. आपले प्रतिबिंब बघून फोटोही शहारलाच मग जरासा..
ट्रेनिंग ला जाताना त्याने आईची आणि मैत्रिणीची भेट घालून दिली.. आईला २५ वर्षापूर्वीचे स्वतःचे प्रतिबिंब त्या मुलीत दिसले.. आई, मी येईपर्यंत तुझ्यासारखं खंबीर बनवून ठेव ग हिला.. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आई ही तरी इच्छा कशी नाकारेल..
एका पिढीने रुजवलेलं स्वप्न साकारायला त्यांचं प्रतिबिंब सज्ज झालं होतं.. "आकाशी झेप घे रे पाखरा.. "