परीक्षेचा निकाल
परीक्षेचा निकाल
आज शाळेचा निकाल होता.आई बाबा सोबत सौम्या तिचा चौथीच्या परीक्षे चा निकाल बघायला गेली. सौम्याला बाकी विषयात ए ग्रेड मिळाला फक्त गणितात बी प्लस मिळाला. ते बघून सौम्याला खूपच टेन्शन आले . आता घरी जाऊन ओरडा खावा लागणार आणि तेच झाले सौम्याच्या च शब्दात वर्णन ऐकू या............
मी आज निकाल बघायला आई बाबा बरोबर शाळेत गेले तर निकाल हातात येईपर्यंत धाकधूकच होती खूप धडकी भरली होती फायनली माझा नंबर आला तर त्याtत बाकी सर्व विषयात ए ग्रेड मिळाला पण गणितात बी प्लस मिळाला. आईने माझ्याकडे बघून रागाचा कटाक्ष टाकला ते बघून अजून मी घाबरले बाबा नॉर्मल होते. पण आईचीच मला भीती होती. आईने मला टीचर समोरच म्हटले घरी चल बघते तुला.टीचर म्हटली की सौम्या खूप मेहनती मुलगी आहे तिला ओरडू नका तिने पूर्ण प्रयत्न केलेत आणि ए ग्रेड म्हणजे काही खराब नाही गणिताचे म्हणाल तर हळूहळू होईल ती improve.. फक्त रोज थोडा सराव लक्षपूर्वक करायला पाहिजे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे बस.. पण तरीही आईची वाटेत सारखी किटकिट सुरु होती. ती म्हणतं होती तुझे ना कशात लक्षच नसते मुळी,अभ्यास मन लावून करत नाही तुझे बाबा तुझ्यासाठी राबराब राबतात मीही दिवसरात्र माझ्या हौशी निवशी सोडून तुझ्याच मागे असते पण तुला त्याची काही जाणीवच नाही.. तु फक्त मस्तीच करते.. बाकी मुले बघ कसे सर्व विषयात ए प्लस मिळवतात. मी आईला म्हटले आई सर्वानाच कुठे ए प्लस आहे.फक्त चार पाच मुलांनाच तर सर्व विषयात ए प्लस आहे.काही मुलांना तर सी आणि डी पण आहेत. तरी त्यांची आई त्यांना काहीच बोलत नाही. मी तर तु सांगते त्याप्रमाणेच सर्व अभ्यास तोंडपाठ करते.तरी मार्क्स मिळाले नाही तर काय करणार तर त्यावर आई म्हणाली तुलना कधीही वरच्यांशी करावी खालच्यांशी नाही आणि मोठ्यांशी उलट बोलू नये आणि वाटेतच माझ्या थोबाडीत मारली. मी घरी येईपर्यंत रडत होते पण तिने बघितलेही नाही.आज मी चौथीतून पाचवीत गेले पण त्याचे कौतुक तिला नाही. मला आई सारखी अभ्यासाला बसवते. माझ्याकडून शब्द न शब्द तोंडपाठ करवून घेते एखादा शब्द इकडचा तिकडे झालेला तिला चालत नाही. मी सर्व तिचे ऐकते ही. मी सकाळी सहाला उठते तयार होऊन सातला बसमध्ये शाळेत जाते.साडे तीन ला शाळेतून घरी येते.घरी आल्यावर खायला देऊन दोन तास अभ्यासाला बसवते नंतर मल
ा बरेच रोज कलासेस पण असतात. कधी कथक, कधी गायन, कधी चित्रकला असे सहा ते आठ कलासेस असतात. नन्तर जेवण झाल्यावर परत अभ्यासाला बसवते. मीही ऐकते. एक तास अभ्यास झाला की साडे नऊ पाऊणे दहा ला मी झोपते.मला ती खाली सोसायटी मध्ये खेळायलाही जाऊ देत नाही. टीव्ही बघू देत नाही आणि सर्व तिच्या मनासारखे करूनही मला मार्क्स मिळाले नाही तर ओरडते. मी काय करू गणित मला जास्त जमतच नाही.कितीही केले तरी परीक्षेच्या वेळी मी गोंधळ घालतेच.गणिताची भिती मला आईमुळेच वाटते मी काही चुकीचे केले की ती खूप ओरडते आणि त्या भीतीमुळेच मला गणित आवडतही नाही.बाकी विषय मी रट्टा मारून करते पण एखादा शब्द विसरला तर मला पुढचे आठवत नाही. कारण आईने मला तशीच सवय लावली जसेच्या तसे शब्द घोकण्याची म्हणून एखादा शब्द विसरला तर प्रॉब्लेम येतो म्हणून बाकी विषयातही ए प्लस न मिळता ए ग्रेड मिळाला. मी सारखी आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते पण मी तिला खुश करूच शकत नाही..मलाही माझ्या बाकी मैत्रिणीसारखं खेळावं वाटते पण तेही करत नाही. माझी एक मैत्रीण आहे ती रोज एक तासच अभ्यासाला बसते आणि आठवड्यातून दोन दिवस तेही शनिवार रविवार कथ्थक ला जाते. तेही तिची आवड बघून तिच्या आईने तिला क्लासला घातले आणि सोसायटी मध्ये रोज मुलांसोबत दोन तीन तास खेळते. टीव्ही शोज ही बघते.तरी तिला सर्व विषयात ए प्लस मिळतात. माझे काय चुकते खरंच काही कळत नाही. कधी कधी मला वाटते की देवबाप्पा ने मला माणूस म्हणून का जन्माला घातले? पक्षी असते तर बिनधास्त उडता आले असते. मला पाहिजे ते करू शकली असती. कुणाचे माझ्याकडून मन दुखावल्या गेले नसते ना कुणाचा ओरडा खावा लागला असता. पण आईचा ओरडा खाण्यापेक्षा तिच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही ह्याचे जास्त वाईट वाटते.
असो पाचवीला मी अजून खूप मेहनत करेल जी मी करतेच. फक्त मला आईने मला बंधन ठेवायला नको थोडा वेळ तरी मला माझ्या मनासारखं करायला द्यायला पाहिजे..
चला आता मला खुप भूक लागली. मी निकाल बघून आली आणि काही बऱ्याच वेळेपासून काही खाल्ले सुद्धा नाही.. ते खाते आणि आज पुस्तके मिळालेच पाचवीचे ते वाचते. म्हणजे आई खुश होईल ...
मी उन्हाळ्यात पण खूप अभ्यास करेल कारण मी नेहमी खेळायला जात नाही त्यामुळे कधी गेले तरी सोसायटी तील मुले मला खेळायला घेत नाही कारण त्यांची टीम बनली असते.. सर्व चूक कदाचित माझीच असेल...