Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Jyoti gosavi

Others


5.0  

Jyoti gosavi

Others


परी

परी

2 mins 1.0K 2 mins 1.0K

परी हे एक मिथक आहे जसे की कामधेनु, कल्पवृक्ष, यक्ष ,किन्नर, राक्षस ,परीस त्याचप्रमाणे परी ही एक काल्पनिक गोष्ट आहे. मग त्यातही अजून जलपरी, सोनपरी, इत्यादी इत्यादी .

त्यांच्या हातात जादूची कांडी असते ,त्यांना पंख असतात, त्या आकाशात उडतात ,त्या पऱ्यांचे एक राज्य आहे ती कधी उडणारी असते. ती कधी पाण्यात पोहणारी असते .ती कधी सुवर्णाची असते. या परी विषयीच्या कल्पना आम्हाला चौथीमध्ये कविता होती "चल चल धरतीवर उतरू  छुम छुम छनन नाच करू.

 ती पहिली आणि मी दुसरी हि तिसरी सुंदर पंख हळू पसरू 

छुम छुम छनन नाचत करू"

 त्या कवितेत एक चित्र होतं सुंदर पंख असणाऱ्या तीन पऱ्या एकमेकींच्या हातात हात घालून ,धरून नाचत आहेत. तेव्हा ते चित्र एकदम भारी वाटायचं आपल्याला पण असे पंख फुटावेत असं वाटायचं. कधीकधी असं स्वप्न पण पडायचं की आपल्याला पंख फुटले आणि आपण आकाशात स्वच्छंद विहार करतोय .मोठे झाल्यावर कळलं परीबिरी काही नसतं एक मिथक नसतं.


प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये एक परी असते .कधी बायकोच्या रूपाने, कधी मुलीच्या रूपाने ,तर कधी प्रेयसीच्या रूपाने, 

लग्न झाल्या झाल्या जेव्हा नव्या नवती चे नवे पणाचे सोहळे चालू असतात ,तेव्हा ती बायको परीच वाटत असते आणि नंतर मात्र दोन चार वर्षात ती कैदाशिण वाटू लागते. हा झाला गमतीचा भाग पण खरोखरी ज्याप्रमाणे परी जादूची कांडी फिरवते त्याचप्रमाणे घरातील स्त्री कष्टाने मेहनतीने घर स्वच्छ ठेवते, तुम्हाला गरमागरम जेवण देते, तुमच्या मनात काय चाललय ते बरोबर ओळखते ,तुमच्या अडीअडचणीला उभे राहते .तिची राखून ठेवलेली पुंजी तुमच्या सुपूर्त करते. घरातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करते त्यामुळे घरची स्त्री कशी हातात जादूची कांडी घेतलेली परी असते त्यापूर्वी प्रियेसीच्या रूपातअसताना ती त्याला सोनपरी दिसते जलपरी दिसते. नंतर पुरुषाच्या आयुष्यात स्वतःची जशी मुलगी येते तेव्हा त्या मुलीचं लग्न होईपर्यंत त् याची प्रिन्सेस असते परी असते डोळ्यातल्या भावली प्रमाणे तो तिला झोपतो जपतो आणि जावयाच्या हातात देताना देखील माझ्या पोरीला झोप माझ्या सोनपरी ला जप असे त्याला बजावून सांगतो.


Rate this content
Log in