प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत
असा मंगेश पाडगावकरांनी म्हटलेलं आहे खरंच सेम असतं का हो? म्हणजे असं काही प्रेम धीट असतं, काही प्रेम लाजाळू असतं, काही प्रेम फक्त नजरेतून व्यक्त होतं. पण शेवटी भावना एकच ना? त्या ठराविक वयात अपोजिट सेक्सबद्दल वाटणारे आकर्षण म्हणजे प्रेमाची सुरुवात
प्रेमाची सुरुवात प्रथम शारीरिक आकर्षणाने होते, मग तिचं रूपांतर भेटीगाठीत आणि अखेर प्रेमात होते.
कोणाचे प्रथमदर्शनी होतं लव्ह अट फर्स्ट साईट
प्रथम तुझं पाहता जीव वेडावला असं होतं.कोणाच प्लॅनिंग पूर्वक होतं. कोणाचं परिचया नंतर होतं पण भावना तीच असते
आता आत्मिक प्रेम करणारे कसे करतात बापडे ते त्यांनाच ठाऊक.
प्रेमाला जातीपातीचे, धर्माचं, देशाचं ,वयाच असं काही बंधन नसतं कोणाचही ,कोणाशीही कधीही प्रेम होऊ शकतं पण मग अशी वेळ येते
"ये इश्क नही आसान
बस आग का दरिया है
और डुब के जाना है"
याचं मोठं उदाहरण म्हणजे मराठीतला कोटीची उडी घेणारा सैराट" चित्रपट
त्यासाठी काही वेडे असंही म्हणतात
"क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव घडो मरणांचा"प्रेमाच्या त्या एका क्षणासाठी आमचे प्रेम वीर असंख्य मरण भोगायला तयार असतात
आता प्रेम फक्त प्रियकर-प्रेयसी यांचच असत का हो? नाही! दोन मित्र दोन मैत्रिणी आई मुलगा वडील मुलगी भाऊ बहीण यांच्यातले देखील प्रेम प्रेम असतं ना! पण त्याचा शारीरिक आकर्षणाची काही संबंध नसतो.
आता तर प्रेमाचा अजून एक नविनच प्रकार निघालाय तो म्हणजे
"गे"किंवा लेसबियन"इतरांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित तो जुना ही असेल पण आता त्याला कायद्याने मान्यता मिळालेली आहे व्यक्तिशः याबाबतीत माझे मत वेगळे आहे माझ्या मते हा प्रकार बरोबर नाही
जे निसर्गाने दिलंय त्याचा आदर केला पाहिजे निसर्ग नियमाच्या चाकोरीत चालले पाहिजे तुम्ही प्राण्यांमध्ये असे प्रकार बघितलेत का की बाबा सिंह सिंहाच्या मागे लागला आहे. किंवा वाघीण वाघिणीच्या प्रेमात आहे गाय ,बैल म्हैस, बकरी पक्षी यांच्या कोणात तरी असे वागताना दिसते का मला तर ही माणसाच्या मेंदूची ची विकृती दिसते
प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचे देणे
प्रेमातले अजून एक भावना माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणून तिचा मर्डर करायचा, तिच्या तोंडावर ऍसिड फेकायचं ,अरे यांना कोणीतरी सांगा!
"प्रेम फक्त भोगात नसून ते त्यागात देखील असतं"
आपला मिलन होणार नाही म्हणून जीव देणारे लैला मजनु हिर-रांजा याच देशात झाले
आणि आयुष्यभर एकमेकासाठी वाट पाहणारी जोडपी इथेच झाली
संयोगिता पृथ्वीराज ही कहाणी इथेच झाली
पण मी म्हणते जीव देऊन किंवा जीव घेऊन ते प्रेम तुम्हाला मिळणार आहे का मग स्वतःचा जीव देऊ नका आणि कोणाचा जीव घेऊ नका जगा आणि जगू द्या