harshada wagh

Children Stories

2.0  

harshada wagh

Children Stories

प्लॅटफॉर्म no.5

प्लॅटफॉर्म no.5

3 mins
541


बाळा तू ठीक आहेस ना?

विशाल खूपच घाबरलेला होता, खरंच आहे इतका मोठा अपघात होता होता वाचला. विशाल एक 9च्या वर्गात शिकत असलेला शालीय विद्यार्थी. विशाल आपल्या गावापासून दूर शहरात शिकत होता गावात शिक्षणाचा ची सोय उत्तम नसल्याने तो शहरात हॉस्टेल मध्ये राहून शाळा शिकत होता तो नेहमी परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या च्या सुट्टीत आपल्या गावाकडे जायचा. बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या गावावरून येऊन तिकडे शिकत होते विशालच्या गावाकडचा एकही विद्यार्थी तिथे नव्हता. विशालच्या गावाला लागूनच दुसऱ्या गावाचे बरेच विद्यार्थी म्हणजे विशाल चे मित्र होते परंतु परीक्षा झाल्यावर सगळे विद्यार्थी सोबतच रेल्वे ने गावाला यायचे. एक वर्ष म्हणजे एक विशाल नववीत असताना परीक्षा संपल्यानंतर आपल्या गावाकडे जायचे वाट बघत होता विशाल चा शेवटचा पेपर होता तू संध्याकाळी आपल्या गावाला जाण्यासाठी निघणार होता तू खूप आनंदात होता इतके दिवस हॉस्पिटलमध्ये राहून अभ्यास करून आपल्या गावाकडे जाण्याची एक मजाच वेगळी असते. त्याने त्याच्या मित्रांना विचारले चला संध्याकाळी निघूया मग गावाकडे त्याचे मित्र म्हणाले अरे आमचा तर एक पेपर बाकी अजून.अरे देवा हो का मग आता काय करावे. विशाल विचारात पडला. जाऊद्या ना मी एकटाच निघतो आता संध्या काळून रेल्वेने .त्याचे मित्र म्हणाले अरे विशाल तू कधी एकटा नाही गेला अजून नको जाऊ नाही मला तर एकही दिवस वाया नाही घालायचा मला तर आता माझ्या गावाला जायचं आहे माझ्या आईवडिलांकडे विशालने कोणाचाही नाही ऐकलं आणि तो संध्याकाळी गावाला जाण्यास निघाला तो खूप आनंदात होता विशाल च्या गावाचा प्रवास लांबचा होता तिच्या गावाला जाण्यासाठी दोन वेळेस ट्रेन बदलावा लागत होती. तसा विशाल बराच वेळ गावाला त्याच्या मित्रांसोबत गेला होता म्हणून त्याला थोडाफार माहित होते संध्याकाळी सहा वाजता निघाला सात वाजताची ट्रेन होती. सात वाजता त्याला ट्रेन भेटली तो ट्रेन मध्ये बसले परंतु एक तासानंतर त्यालाही ट्रेन सोडून दुसरे ट्रेनमध्ये बसायचे होते एक तासानंतर म्हणजे आठ वाजता तो दुसऱ्या शहराच्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबला तिथून त्याला नऊ वाजता ट्रेन होती. तू ट्रेनची खूप आतुरतेने वाट बघत होता. 

  विशाल ट्रेन ची वाट बघत बघत प्लॅटफॉर्मच्या जवळ जवळ जाऊ लागला तो चोकशी च्या ठिकाणी विचारण्या साठी गेला तेव्हा त्याला माहित झाले कि ट्रेन 10वाजेची आहे आणि लेट ही होऊ शकते कोणती ट्रेन आले की तो पटकन तेथे जाऊन जवळ जाऊन उभा राहून वाट बघत होता असा बघता बघता अचानक ट्रेन आली आणि विशाल चा पाय निसटला आणि अचानक विशालचा हात कोणीतरी धरला अन त्याला होडून आपल्या मिठीत घेतले. आणि त्याचा जीव वाचवला इतका मोठा अपघात होता होता वाचला. विशाल खूपच धर घाबरला होता. तो कोणाच्या मिठीत आहे त्याला माहित नव्हते तो डोळे बंद करून शांत पणे उभा होता.

बाळ तू ठीक आहेस ना? असा प्रश्न त्याला ज्या व्यक्ती ने वाचवले त्याने केला.ती व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी विशाल ने त्या वक्ती जवळ पहिले.

ती व्यक्ती एक महिला होती. दिसण्यात सुंदर होती. विशाल ने तिला विचारले आपण कोण आहात. कारण तिचे केस मोकळे होते. आणि इतक्या रात्री ही कोण आहे प्लेटफॉर्म वर विशाल घाबरला कोण असेल ही महिला खरंच कोणी भूत प्रेत तर नसेल? इतक्या रात्री ही एकटी प्लॅटफॉर्म वर ती काय करत होती?

ती महिला कोण आहे ते बघण्यासाठी विशालने वर बघितले. ती महिला सुंदर होती तिचे लांबसडक असे केस होते परंतु तिने पांढर्‍या रंगाची साडी नेसली होती बांगड्या ही नव्हत्या कपाळावर टिकली नव्हते. कोणत्याही महिलाचे असं वर्णन करा रात्री बघून कोणीही घाबरेलच. विशाल तर लहानच होता 12-14 वर्षाचा मुलगा. परंतु त्या महिलेने खूप प्रेमाने लाडाने विशाल ला विचारले बाळा तू ठीक आहेस ना? जणू हे काही आपल्या मुलाला विचारत आहे. परंतु ही महिला कोण आहे एवढ्या रात्री एकटी प्लॅटफॉर्मवर काय करत आहे पण असे वर्णन खरच कोणी भूत-प्रेत तर नाहीये ना विशाल च्या मनातील गोष्ट ही घर करत होती.

 परंतु तिचे प्रेमाने बोलणे ऐकून विशाल ही तिच्याशी बोलू लागला. हो मी ठीक आहे. तुमचे खूप खूप आभार तुम्ही आज माझा जीव वाचवला. पण तुम्ही कोण आहात.? असा प्रश्न विशालनेत्या महिला केला महिलेला केला.

 आधी बाळ तू मला सांग तू इथे काय करतोय एवढा रात्री, आणि तुझ्या सोबत कोण आहे. तुझं नाव काय आहे? असे प्रश्न ती महिला विशाल ला करू लागली. तिच्या एवढ्या प्रेमाचे बोलणे ऐकून त्याने तिला सांगितले माझं नाव विशाल आहे. मी तर होस्टेल आहे ना तिथे राहतो आणि तिथल्या शाळेत शिकतोय मी नववीच्या वर्गात आहे. असं तर मी नेहमी माझ्या मित्रांसोबत माझ्या गावाला जातो परंतु माझ्या मित्रांचा एक पेपर राहिल्यामुळे मी एकटाच गावाला निघालो. गावाला जायची खूप उत्सुकता होती ना मला असं वाटतं खरंच नाही आलो असतो तर बरं झालं असतं.उद्या मित्रांसोबत निघालो असतो मग परंतु तुमचे खूप खूप आभार हा तुम्ही माझा जीव वाचवला.

 विशाल तू काही जेवलास का?असा प्रश्न त्या महिलेने विशालला केला. विशाल म्हणाला नाही ना मावशी काय करू खूप भूक लागली आहे परंतु ही ट्रेन लेट होण्याचे चक्कर मध्ये काही जेऊ शकलो नाही. चल विशाल तुला मी काय खाऊ घालते तुला भूक लागली आहे ना आणि असाही तुझी ट्रेन लेट आहे चील तोपर्यंत काही खाऊन येऊ. विशाल च मन मागेपुढे होत होता परंतु भूक लागली होती म्हणून विशाल त्या माहिले सोबत काही खाण्यासाठी निघून गेला. ती महिला विशाल लय का घरात घेऊन आले त्या घरात खूप छान छान पदार्थ जेवणात बनवून ठेवले होते त्या महिलेने विशाल ला जेवायला वाढले व पोटभरून जेवू घातले. त्यानंतर ती महिला विशाल ला पुन्हा प्लॅटफॉर्मवर घेऊन आली आणि त्याच्यासोबत त्याच्या ट्रेन ची वाट पाहू लागली. विशाल ने त्या महिलेस प्रश्न केला आता तरी सांगा तुम्ही कोण आहात. आणि तुम्ही जा आता माझी ट्रेन आली की मी चालला जाईल.

 बाळ मी माझ्या मुलाची वाट बघत आहे तो येणार आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकतो. तो तुझ्यासारखा होस्टेलला शहरात शिकतो. तुमचा मुलगा कधी येणार आहे तो रोज मला सांगतो मी येईल मी दररोज येथे येऊन तिची वाट बघते पण तो येतच नाही असं बोलताना त्या महिले च्या डोळ्यात अश्रू येत असतात. तुमच्या मुलाचं नाव काय आहे? त्याचं नाव तर अभय आहे तो ही परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला येत असतो. त्याचीच वाट बघते आहे बाळा रोज मी.

 मग ते दोघं मिळून ट्रेन ची वाट बघतात. आणि अचानक ती महिला जोरात किंचाळते विशाल त्या महिले पासून दूर जातो परंतु विशाल पुन्हा त्या महिलेला जवळ जाऊन विचारतो काय झालं मावशी इतक्या जोरात का ओरडला अरे विशाल बघ तो तो मुलगा ट्रेन खाली आला ती ट्रेन त्या मुलावर चालला गेली. विशाल बोलतो मावशी असं काही झालं नाही तुम्ही शांत राहा विशाल त्या महिलेला शांत करतो.

 काही वेळानंतर विशाल ची ट्रेन येते आणि विशाल ट्रेनमध्ये बसून निघून जातो ती महिला विशाल ला हात देऊन बाय करते आणि त्याची एक गोड पप्पी घेते जणू एक आई आपल्या मुलाशी प्रेम करत आहे. विशाल त्या महिले ला बोलतो मावशी तुमचा मुलगा नाही आला तर तुम्ही लवकर घरी जा. हो बाळा असे बोलून विशाल ची ट्रेन निघते

 परंतु पुन्हा ती महिला तिथे येऊन बेंचवर बसून राहते. का ती महिला रोज येवून ती तिच्या मुलाची वाट बघते,का तिचा तो मुलगा तिला भेटायला येत नाही आहे 😥😥😥😥😥😥

विशाल ट्रेन मध्ये बसू न निघून जातो परंतु ती महिला पुन्हा बेंच वर येऊन बसून राहते. बारा वाजेपर्यंत ती महिला तिथेच बसून राहते. ती महिला कोणाशी काही बोलत नाही बस येणाऱ्या ट्रेनला बघत असते आणि प्लॅटफॉर्मवर येणार्‍या-जाणार्‍या लोकांना बघत होते. रेलवे च्या पटरीना बघत असते.

काही वेळानंतर ती महिला चौकशी करण्यासाठी चौकशी क्षेत्रात जाते. आणि त्या कर्मचाऱ्यांना विचारते त्या गावावरूनट्रेन येणार होती ना अजून आली नाही. तो कर्मचारी त्या महिलेला बघून घाबरतो कारण की तो पहिल्यांदाच नाईट ड्युटी करीत असतो आणि त्या महिलेला त्याने पहिल्यांदाच पाहिला असतो. तो कर्मचारी त्या महिलेला बघून घाबरतो आणि त्या च्या तोंडातून आवाज निघत नाही. परंतु तितक्यात तिथे एक जुना कर्मचारी येतो आणि त्या महिलेला सांगतो कि ती ट्रेन आज नाही आली तुम्ही उद्या या ती ट्रेन उद्या येणार आहे त्या कर्मचारी तेवढे बोलणे ऐकून ती महिला तेथून निघून जाते.

मग तो नविन कर्मचारी जुन्या कर्मचा-याला विचारतो की ही अशी कोण आहे अशा अवस्थेत. तिचा असं भयानक वर्णन पांढरी साडी बांगड्या नाही पूर्णपणे केस मोकळे कोणीही तिला बघून घाबरले परंतु ही महिला एवढ्या रात्री प्लेटफॉर्म वर काय करत होती. खरंच ही कोणी महिलाच होती ना कोणी भूत प्रेत तर नव्हती. सांगा ना.....

मग मग तो जुना कर्मचारी नवीन कर्मचाऱ्यास सांगतो त्या महिलेची जी परिस्थिती आहे ना त्याचा अनुभव कोणीही करू शकत नाही त्याची जाणीव कोणालाच नाही. ती महिला फार दुखत आहे बिचारी. परंतु ती आहे तरी कोण आणि अशा अवस्थेत का होती आणि तेवढ्या रात्री इकडे काय करत होते.

दोघी नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा असा त्यांचा सुखाचा परिवार होता परंतु अचानक काही दिवसांनी त्या महिलेच्या पती चे निधन झाले. मुलाला त्या दोघांनी शहरात शिकायला पाठवले होते त्यांचा मुलगा होता अभय नावाचा तू अकरावीच्या वर्गात शिकत होता वडिलांचे निधन झाले परंतु त्यांची परीक्षा सुरु होती म्हणुनु तो वेळे वर येऊ शकला नाही. काही दिवसांनी त्याचा फोन आई ला आला आई मी आज संध्याकाळी येत आहे आणि मी आता तूझ्या जवळच राहील. मी येत आहे आई

त्या आई ने मुलाच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार केले. आणि संध्याकाळी मुलाला घेण्यासाठी प्लॅटफॉर्म वर आली. ट्रेन फारच लेट होती. मुलीला पाहण्यासाठी आई फार उत्सुक होती. पतीच्या निधणाचे दुःख विसरून ती आपल्या मुला जवळ पाहत होती. ती आता फक्त आपल्या मुलासाठी जगण्याचा चा विचार करत होती.

वाट बघत बघत फार वेळ झाली. आणि ट्रेन आली. परंतु ती ट्रेन प्लॅटफॉर्म नं 5वर आली आणि ती महिला प्लॅटफॉर्म नंबर  2 वर उभी होती. तिच्या मुलाने तिला पहिले दुरूनच आई ला पाहता त्याच्या डोळ्यात अश्रू येण्यास सुरुवात झाली. त्याला ब्रिज क्रास करून प्लॅटफॉर्म नं 2वर यायचे होते. परंतु तो असं न करता ट्रेनच्या पट्रीवरून आई जवळ येऊ लागला आई ही मुलाला बघत होती. दोघाची नजर फक्त एकमेकांवर होती.

आणि..... आणि आणि काय झालं मग....

मग ती नजर तिथेच थांबली. अचानक ट्रेन आली आणि अभय... आणि अभय नाही राहिला त्याच्या आई चा किचळण्याचा तो आवाज आज ही प्लॅटफॉर्म वर गुंजाळ त.आहे ट्रेन फक्त अभय वरून नाही गेली तर ती त्या आईच्या जीवनावरून गेली. आपलात मुला सोबतच ती  आई तिथेच मरून गेली परंतु शरीराने नाही आत्मेने. ही जी महिला गेली आहे ना तो फक्त एक शरीर आहे. ती रोज प्लॅटफॉर्म वर येऊन आपल्या मुलाची वाट बघते आणि रोज रात्री चौकशी करून पुन्हा आपल्या घरी निघून जाते. घरी ती रोज आपल्या मुलाचं आवडीचा स्वयंपाक तयार करते. मुलाच्या आशेत रोज ती इथे येते.

ही महिला जेव्हा ही इथे येऊन विचारेल तर तिला एवढं सांगायचं कि ती ट्रेन आज नाही आली ती उद्या येणार आहे फक्त एवढं चा प्रेमाने सांगा ती आई आहे आपल्या मुलाची वाट पाहत आहे तिच्या ह्या जीवनालीत दुःख कधी संपेल कारण जीवनच संपलं आहे. 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



ही कथा आपण सगळ्यांना आवडली असेलच..... 🙏🙏🙏

कमेन्ट करून नक्की सांगा 




Rate this content
Log in