पहिला दिवस 25/12/2020
पहिला दिवस 25/12/2020


भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय जनतेला संदेश दिला की कोरोनाला दूर करण्यासाठी 21 दिवसाचा संपूर्ण भारतभर lock down असेल, त्यानुसार आज त्या lock down चा पहिला दिवस. सकाळी उठल्यावर शाळेत जाण्याची धावपळ सुरु व्हायची पण आज सर्व निवांत होतं. सकाळी लवकर उठलो आणि लक्षात आलं की आज गुढपाडव्याचा सण आहे, मग काय तारांबळ झाली विचारता सोय नाही. घाई गडबडीत सगळी व्यवस्था करुन गुढी उभारली. सुट्टीचा एका बाजूला आनंद होता, पण आता कोठेतरी कंटाळा यायला सुरवात झाली.
शेवटी संध्याकाळी चहा घेताना ठरवले की उद्यापासून घरात असलेली काही निवडक पुस्तके वाचायची. त्याची सुरवात म्हणून काही निवडक पुस्तके शोधून ती सहज हाती पडतील अशा ठिकाणी ठेवली आणि जेवण करुन रात्री झोपायला गेलो.