फाडी त्याला साडी
फाडी त्याला साडी


तगवी त्याला भगवी
फाडी त्याला साडी
ही एक ग्रामीण पारंपारिक म्हण आहे ,आणि या म्हणीचा अर्थ त्याच्या शब्दात आहे. परंतु तो समजणाऱ्याला समजला पाहिजे.
आपल्या घरातच काही व्यक्ती अशा असतात की, ज्या कायम वारेमात उधळपट्टी करतात ,परंतु त्यांना परत ती गोष्ट दिली जाते, पुरवठा केला जातो. आणि काही व्यक्तींना जपून वापरण्याची सवय असते. तर त्यांना मात्र लवकर ती गोष्ट पुन्हा मिळत नाही.
उदाहरणार्थ दोन बहिणी किंवा दोन सुना आहेत ज्यांना कपडे घेताना साधारण त्यावेळी घरातल्या सगळ्यांना बरोबर कपडे घेतले जायचे.
आता भारीतल्या दोन साड्या ,दोन बहिणी किंवा सुना यांना दिल्या. त्यापैकी एक वारंवार कोणत्याही छोट्या छोट्या कार्यक्रमाला देखील ही भारीतली साडी वापरते .त्यामुळे ती साडी लवकर खराब होते, आणि दुसरी मात्र व्यवस्थित घड्या घालून ठेवते, जपून जपून वापरते .
कधीतरी कार्यक्रमाला वापरते, त्यामुळे तिची साडी नवी कोरी तशीच्या तशी राहते.
पण कधीतरी मग घरात एखादा कार्यक्रम असतो तेव्हा एकीची साडी वापरून वापरून खराब झालेली असते, तिला पुन्हा नवी साडी मिळते .का❓ तर तिच्याकडे कार्यक्रमात घालायला साडी नाही .
पण जी मात्र जपून साडी वापरते तिची साडी नवी कोरी दिसते. त्यामुळे तिला काही दुसरी साडी मिळत नाही. किंवा तिलाच जिची खराब झालेली साडी आहे तिला तुझी साडी वापरायला दे कधीतरी दे असा आग्रह केला जातो किंवा जबरदस्ती केली जाते. यालाच म्हणतात
फाडी त्याला साडी
तगवी त्याला भगवी