पाचवा दिवस 29 / 03 / 2020
पाचवा दिवस 29 / 03 / 2020
काळ जसा पुढे जातो (सरकतो) तसा माणूस नवीन गोष्टी स्वीकारत जातो. मात्र जुन्या गोष्टी त्याच्या चांगल्या लक्षात राहतात. अशा या आठवणींचा मृदगंध अचानक मोकळा झाला की होणारा आनंद अवर्णनीय असतो. तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले, रामायण ही मालिका पुन्हा टीव्हीवर पाहता येणार हे ऐकून मला खूप आनंद झाला. लहानपणी मी ही मालिका आवडीने पाहिली होती. ही मालिका लागल्यानंतर लहानपणी रस्ते सामसूम झाल्याचे मला आठवते. घरातील आजी आजोबा मालिकेतील प्रसंगाला मनापासून दाद द्यायचे आणि कधीकधी भावनाविवश होऊन रडायला लागायचे. त्या का
ळात आजच्यासारखी डिजिटल व्यवस्था नव्हती. गच्चीवर एंटीना असायचा. सिग्नल व्यवस्थित आला नाही की मालिकेत गडबड व्हायची काहीवेळ चित्र दिसायची नाहीत, मग घरातील मोठी माणसं गच्चीवर जायची आणि एंटीना फिरवायची. चित्र व्यवस्थित दिसू लागलं ती घरातून माणसं ओरडायची आणि मग त्याची वरती माणसं घरी यायची. खरोखर किती रम्य काळ होता तो ! आत्ताच्या डिजिटल युगात ही मालिका कशी वाटेल या अपेक्षेने मालिका पाहिला बसलो, मालिका सुरू झाली आणि तसा तसा मी मागच्या आठवणीत गुंतून पडलो. दिवसभर एका वेगळ्याच नादात होतो मी.