शब्दसखी सुनिता

Others

3.5  

शब्दसखी सुनिता

Others

ऑनलाईन क्लास आणि मी

ऑनलाईन क्लास आणि मी

2 mins
100


कोरोनामुळे सगळ जगच बदललय तशी मीही बदलले. मी पेशाने शिक्षिका. कधी ऑनलाईन क्लास ची वेळ आली नाही पण कोरोना विषाणुने जगभर थैमान घातल. सर्व शाळा, काॅलेज, शिकवण्या बंद झाल्या त्याऐवजी घरूनच ऑॅनलाईन क्लास सुरू झाल. मला वयामुळे काॅम्य्युटरच थोडस ज्ञान आहे पण मला प्रश्न पडला आता मी ऑनलाईन क्लास कशी घेणार, कस मुलांना शिकवणार असे खुप सारे प्रश्न मी शिक्षिका असुन पडले. यावरही आधी चर्चा झाल्या. मत मागवली गेली. पण कोरोनामुळे शाळा भरवणे शक्य नव्हते आणि एकीकडे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुसकान होऊ नये म्हणून शेवटी ऑनलाईन शिक्षणपद्धती सुरू झाली.


शाळेत न जाता घरूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जाॅईन करून क्लास घ्यायचे. हे माझ्यासाठी नवीनच होत. एक लहान प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे आमच्या वेळच शिक्षण ते ऑनलाईन शिक्षण हा एवढा मोठा बदल होता. खेड्यापाड्यापर्यंत आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या घरी असतो. आताच्या पिढीला तर मोबाईल आणि काॅम्प्युटर मधल सगळ कळत. आधुनिक युग आहे. खुप बदल झाले आहेत. आधुनिक विचारांच्या आणि सुशिक्षित पालकांच्या मते घरच्या घरी शाळा हा पारंपारीक शाळांना उत्तम पर्याय आहे अस सांगितल गेल. मग शासनानेही लाॅकडाउनचा विचार करून ऑनलाईन क्लास सुरू केले.    

हे सगळ ठिक वाटत होत विद्यार्थ्यांचा विचार करता पण माझ्यासाठी एक शिक्षिका म्हणून आपल्याला जमेल की नाहि वाटायच, पण माझ्या मुलीला नतालीला माझी ही अडचण सांगितली. ती नामवंत कंपनीमध्ये जाॅब करणारी, तिचही ऑफिस बंद झाल. आणि वर्क फ्राॅम होम सुरू झाल. मग नताली म्हणाली. " एवढच ना मम्मा, मी तुला सांगेल त्या ऑनलाईन क्लासच, अग तु घाबरतेस कश्याला ? तुझ्या वेळेस नव्हत हे ऑनलाईन शिक्षण मला माहीती आहे पण आजकाल सगळ ऑनलाईनच झालाय आणि माझही काम आता ऑनलाईन सुरू राहणार आहे ऑफिसला जाणार नाही तर अस आहे बघ मी तुलासगळ शिकवेल, सांगेल. डोन्ट वरी मम्मा. आपल्या लेकीचे शब्द ऐकुन मेधाला बर वाटल. नलिनीने आपल्या आईला लाडाने मिठी मारली. लाॅकडाऊन मुळे ती तिच शहर सोडून आईजवळ राहणार होती. मेधाला मुलीकडून हे सगळ काॅम्प्युटरच ज्ञान शिकण्याची नवी संधीच चालून आली तिनेही त्याच सोन केल.       


विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास कस घ्यायच, कस जाॅईन करायच त्यासाठी वापरल जाणार Zoom app कस वापरायच, त्यांच्याशी एखादी फाईल किंवा व्हिडीओ कसा शेअर करायचा. ऑनलाईन attendance त्यानंतर ऑनलाईन क्लास, टेस्ट कशी घ्यायची वगैरे सगळ शिकवल. मेधाला सगळ शिकवल गेल. तसेच नलिनीने तिला सगळ शिकवल. तेव्हा मेधाला सगळ सोप वाटु लागल. हळूहळू मेधा सगळच शिकुन जाते. ऑनलाईन क्लास तिला घेता येऊ लागले. तसेच मुलीने तिला काॅम्प्युटरच बरच शिकवल. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मेधाला तिची मुलगी सगळ नवीन तंत्रज्ञान माहीती सांगायची. ते दाखवायची शिकवायची. तिही ऑनलाईन कस काम करते सगळ दाखवल. तेव्हा मेधाला समजल की खरच हे सगळ ऑनलाईनच छान आहे. अगदी घर बसल्याही मुले शिकु शकतात. आज मला कुठलिही अडचण नाही. मी लाॅकडाउन मधील वेळेत खुप नवीन गोष्टी शिकले.  


Rate this content
Log in