The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Vasudha Naik

Others

3.0  

Vasudha Naik

Others

online school

online school

2 mins
574


    कोरोंना काय आला न सर्वच फासे उलटे पडले. लाॅकडाऊन झाले तेही ऐन द्वितीस सत्राच्या वेळी .परीक्षा घेतच होतो.तोंडी परीक्षा चालू होत्या.आणि या भयंकर विषाणूने हैदोस घातला व शाळा काय सर्वच बंद झाले .

   त्यावेळेपासून ऑनलाईन शाळा सुरू झाली. मोबाईलवरची शाळा. मला सवय आहे असा अभ्यास मुलांपर्यंत मी गेली पाच वर्ष पोहोचवत होते. वर्गात काय होते याचे फोटो,व्हिडीओ मी पाठवत असायची. पण हाय!आत्ता हे अतीच झालेय हो.

   लहान मुले आपण सांगतो मुलांना मोबाईल हाताळायला देवू नये,आणि आता आपणच पाठी लागतोय मुलांचा अभ्यास मोबाईलवर घ्या,

    बर माझी मुलं लहान आहेत. त्यामुळे फक्त ऑडिओृपी.डी.एफ,व्हिडिओ द्वारा अभ्यास चालू आहे ,पण जर समूहावर चाळीस पालक असतील तर त्यातील वीस,पंचवीस पालक मुलांचा अभ्यास घेतात.

   मी काही बोलू शकत नाही. शासनाचा निर्णय पहिली,दुसरीला अभ्यास द्यायचा नाही ,पण मी अगदी तासभराचा अभ्यास देते,तेवढेच मुले करतील व अभ्यासाची सवय राहील.

   हे झाले लहान मुलांचे पण मोठ्या मुलांना झूम ॲपद्वारे शिक्षण दिले जातेय, किती अडचणी येतात हे घेताना. कधी नेटवर्क नसते, कधी लाईटच नसते, कधी नेटपॅक संपलेला असतो.. एका या ॲपवर किती मुलं शिक्षण घेणार हो! पण पाटी कोरी राहण्यापेक्षा तेवढेच त्यांचा अभ्यासतयार होईल. ही अपेक्षा आपल्या शिक्षकांची. पण मोबाईवरची शाळा काही खरी नाही, वर्गात अभ्यास घेणे व असा अभ्यास घेणे खूप अडचणीचं आहे. पण सद्यस्थितीत या शिवाय दुसरा पर्याय नाही.

  मोबाईलवरची शाळा

  लावायला जातेय खरा लळा

पण होवू शकत नाही संपर्क नीट

बाई शोधतात मोबाईलवर बाळा.....Rate this content
Log in