नववर्षाचा संकल्प
नववर्षाचा संकल्प
नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी नवीन वर्ष येते, एकदाच नाही तर आपल्या भारतात चार चार वेळा येते. गुढीपाडव्याला सुरू होते दिवाळीच्या पाडव्याला सुरु होते गुढीपाडवा म्हणजे शालिवाहन शक दिवाळीचा पाडवा म्हणजे विक्रम संवत्सर शिवाय शिवाय जैन नववर्ष, पारशी नववर्ष इत्यादी इत्यादी आणि आपण दरवर्षी काहीतरी संकल्प करतो आणि फार-फार तर पाच जानेवारी, 10 जानेवारी इथपर्यंतच टिकतो. कधी मॉर्निंग वाॅकचा संकल्प असतो, दारुडी माणसे उद्यापासून दारू न, पिण्याचा संकल्प घेतात, कोणी शिव्या न देण्याचा संकल्प घेतात, कोणी व्यायाम करण्याचा संकल्प घेतात आणि आपल्या सार्या भीष्मप्रतिज्ञा नंतर कृष्ण प्रतिज्ञा होतात.
त्यामुळे मी कोणताही संकल्प करत नाही लोकांना मदत करणे, लोकांशी चांगले वागणे, लोकांना अपशब्द न बोलणे, आपले ड्युटी प्रामाणिकपणे करणे, एवढे जरी पाळले तरी झाला नववर्षाचा संकल्प पुरा.