Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

नवरा मेला तरी चालेल पण

नवरा मेला तरी चालेल पण

1 min
64


नवरा मेला तरी चालेल पण

 सवत रंडकी झाली पाहिजे


ही एक ग्रामीण पारंपारिक म्हण आहे. 

हिच्या शब्दांमधून आपल्याला ह्याचा मतितार्थ समजतो. 

आहो किती हा दुष्टपणा! त्याची काही सीमा आहे की नाही? म्हणजे दुसऱ्याच वाटोळं करण्यासाठी मग आपल्या स्वतःच वाईट झालं तरी चालेल .

सगळ्यात जवळचा म्हणजे नवरा ,आणि सगळ्यात दुश्मन म्हणजे सवत . 

 आता बघा त्या बाईच्या मनातला विचार कसा! 

ही! ही !माझी सवत कशी नटून थटून  सोळा शृंगार करून माझ्यासमोर मिरवते. आता हिचा नवराच मेला पाहिजे ,म्हणजे ही रंडकी होईल आणि हिला नटायला मुरडायला लोकांमध्ये मिरवायला मिळणार नाही. 


पण त्यावेळी ती बाई हा विचार करत नाही की, दोघींचा देखील नवरा एकच आहे. तो मेला तर आपण देखील तिच्याच पठडीमध्ये बसणार आहोत..आपण देखील रंडकीबोडकी होणार आहोत. 

शिवाय जिवाचा जिवलग जवळचा म्हणजे नवरा, तो मरून कसं चालेल? 

पण म्हणतात ना अति संतापामध्ये तिला काही हा विचार सुचत नाही ,आणि स्वतःच्या सवतीला ती तळतळून तुझा नवरा मरूदे म्हणून शिव्या शाप देत राहते .

थोडक्यात

 "अति राग आणि भीक माग "

असा देखील त्याचा अर्थ होतो.


Rate this content
Log in