SWATI WAKTE

Children Stories Fantasy

3  

SWATI WAKTE

Children Stories Fantasy

नोबेताचा ऑनलाईन क्लास

नोबेताचा ऑनलाईन क्लास

3 mins
304


नोबेताला अभ्यासाचा, शाळेचा फार कंटाळा येतो. तसा तो अत्यंत आळशीच असतो. आता कोरोनामुळे लॉकडाऊन असतो. शाळाही ऑनलाईन असते. आता काय नोबेताला ना लवकर पोहोचण्याचे टेन्शन, ना कसलेच. नोबेताचे ऑनलाईन क्लास 8 वाजता सुरु व्हायचे. आई आवाज देऊनदेखील लवकर उठायचा नाही आणि बेडवर पडल्या पडल्याच क्लास जॉईन करायचा.


ऑनलाईन क्लासमध्ये काही लक्ष नसायचे. क्लास जॉईन करून ऑडिओ, व्हिडिओ ऑफ करून दुसरीकडे कॉम्प्युटरवर गेम्स खेळत बसायचा. सर त्याला रोज काही विचारायचे पण त्याला काहीच येत नसे. सर्व विषयातच नोबेताची बोंब होती. सर होम वर्क द्यायचे आणि ते पूर्ण करायला आणि सबमिट करायला एक दिवस द्यायचे पण नोबेताचे कोणतेच वर्क पूर्ण नसायचे. मग सर चिडून त्याच्या बाबांना फोन लावून सांगतात की नोबेताचे कोणत्याही क्लासमध्ये लक्ष नसते ना कुठलेही वर्क पूर्ण असते तुम्ही लक्ष द्या नाहीतर त्याला हे वर्ष रिपीट करावे लागेल.


नोबेताचे बाबा खूप चिडतात. त्याचे कॉम्प्युटरमधील सर्व गेम्स delete करतात आणि त्याच्या आईला सांगतात की याला ऑनलाईन शाळा झाल्यावर बिल्कुल गेम्सला हात लावू द्यायचे नाही. याचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण झालाच पाहिजे, हे ऐकून नोबेता खूप रडतो आणि डोरेमॉनला मदत मागतो.


तो डोरेमॉनला म्हणतो की, डोरेमॉन मला मदत कर माझे होमवर्क पूर्ण झाले पाहिजे आणि वर्गात काय चालले हे मला समजले पाहिजे यासाठी काही तुझ्या पॉकेटमध्ये गॅजेट असेल तर दे. मी दिवसभर गेम्स खेळल्याशिवाय राहू शकत नाही.


डोरेमॉन म्हणतो, मला विचार करू दे थांब थोडा. डोरेमॉन विचार करतो आणि पॉकेटमध्ये हात घालून म्हणतो, आठवले मी तुला मदत करू शकतो आणि एक मोठ्या पेन्सिल सारखी वस्तू पॉकेटमधून काढून म्हणतो ही घे मॅजिक पेन्सिल... नोबेता आश्चर्याने म्हणतो मॅजिक पेन्सिल.. याचा कसा वापर करायचा...


डोरेमॉन म्हणतो, एकदम सोपे जेव्हा सर शिकवतील तेव्हा याला नोटबुक वर आपण जसे लिहितो तशी नोटबुकवर पेन्सिल ठेवायची. सर जे बोलतील ते ती पेन्सिल आपोआप लिहील पण जेव्हा सर जनरल बोलतील तेव्हा ती पेन्सिल नोटबुक वरून काढून टाकायची नाहीतर तेही ती पेन्सिल लिहील. जसे सर कुणाला ओरडले किंवा चिडले तर तेही ती पेन्सिल लिहील. आणि जेव्हा सर प्रश्न विचारतील तेव्हा त्या पेन्सिलला त्या प्रश्नाचे उत्तर विचारायचे ती पेन्सिल लगेच लिहून देईल व तेच सरांना वाचून दाखवायचे.


नोबेता खूप खुश होतो. डोरेमॉन म्हणतो, अजून एक गोष्ट लक्षात ठेव जर तू चुकीच्या वेळी पेन्सिल ठेवली आणि नोटबुकमध्ये चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आणि सरांनी तुला रागावले तर ती पेन्सिल नेहमी चुकीच्याच गोष्टी लिहील त्यावेळी तुला सरांचे जास्त बोलणे ऐकावे लागेल.


नोबेता म्हणतो, नाही डॉरेमोन असे नाही होऊ देणार मी. दुसऱ्या दिवशी पेन्सिल नोटबुकवर ठेऊन बसतो. पहिल्या दिवशी सरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पेन्सिलने लिहिल्या जातात. नोबेताही सरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन महत्त्वाच्या गोष्टींच्यावेळी पेन्सिल नोटबुकवर ठेवतो. प्रश्न विचारल्यावर रिपीट करतो आणि पेन्सिल लिहून लगेच देते ते तो सरांना सांगतो.


सर खूप खुश होतात. नोबेताची खूप स्तुती करतात. जियानला एका प्रश्नाचे उत्तर येत नाही तेही नोबेता देतो. जियानला सर रागावतात आणि म्हणतात, बघ नोबेता कसा अभ्यासाला लागला. हे बघून जियानला वाटते की नोबेताला नक्की काहीतरी डोरेमॉननी गॅजेट दिले.


तो संध्याकाळी मास्क लावून नोबेताकडे येतो आणि त्याला धमकी देऊन विचारतो, नोबेता मला गॅजेट दे.. नोबेता म्हणतो, कोणते गॅजेट...


तेच तुला डोरेमॉननी दिले. नाहीतर तुला मारेल.


नोबेता घाबरून जियानला गॅजेट देतो.


दुसऱ्या दिवशी जियान मॅजिक पेन्सिल घेऊन बसतो आणि त्याला त्याचा कसा उपयोग करायचा हे पूर्ण माहिती नसते फक्त नोटबुकवर पेन्सिल ठेवायची हे माहित असते. तो नोटबुकवर पेन्सिलद्वारे लिहितो. मध्येच सर नोबेताची नोटबुक चेक करायला मागतात तर आज पेन्सिल नसल्यामुळे नोबेता नोटबुकमध्ये काहीच लिहीत नाही.


सर नोबेताला खूप रागवतात. जियानची पेन्सिल नोटबुकवरच असते पेन्सिल रागावलेलेही लिहिते. जेव्हा सर जियानची नोटबुक पाहतात तेव्हा त्यांना सुरुवातीला चांगली दिसते. नंतर नोबेताला दिलेल्या शिव्याही त्यात दिसतात.


सर जियानला ओरडतात, हे काय लिहिले जियाबा आणि नंतर पेन्सिल सरांनी रागावल्यामुळे सर्व चुकीच्या गोष्टी लिहिते. जियानला परत ओरडा बसतो.


पेन्सिल डोरेमॉननी सांगितल्यामुळे चुकीचेच लिहिते. जियान चिडून नोबेताकडे येतो आणि नोबेताला चांगलंच बदडतो. मॅजिक पेन्सिल आता काही कामाची राहत नाही. आणि नोबेताचे आई-बाबाही त्याचे गेम्स त्याला परत देत नाही. त्यामुळे नोबेता जोरात रडतो...


Rate this content
Log in