Vasudha Naik

Others

3.4  

Vasudha Naik

Others

निवारा

निवारा

2 mins
222


 हो,निवारा आपण ज्या घरात राहतो तो निवाराच होय ना!

   आपल्या प्रमुख गरजा अन्न,वस्त्र,निवारा याच आहेत हो ना..

   आपण ज्या घरात राहतो तेथे आपल्याला सुखशांती मिळते.आपले कुटुंब असते.प्रेम,माया,ममता मिळते.आपण सारे एकमेकांसाठी काम करतो.दुखले खूपले तर पाहतो.सेवा करतो.सेवा करून घेतो.लाड करतो.लाड पुरवूनही घेतो.

  आपल्या डोक्यावरील एका छतात राहणारे आपण सर्व एकमेककांची छान जपणूक करतो.कधी भांडतोही पण ती पेल्यातील वादळे असतात.

  हे का सांगतेय असे वाटले असेल न हो आपल्याला!तर आता ऐका ..

  माझ्या लग्नाचा वाढदिवस दि.१२ मे२०२२ ला संपन्न झाला.वैभव व वसुधा चक्क ३७ वर्ष एकत्र राहून सुरेख संसार झाला.

  वैभवचे आजारपण आपल्या सर्वांना माहितच आहे.आमच्या २५ साव्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी आम्ही लीलावती हाॅस्पीटल मुंबईवरून यांचे मेंदूचे मोठे ऑपरेशन करून पुण्याला परत आलो होतो.मला खूप धाकधूक होती मी हा दिवस पाहिन की नाही.पण दैव जाणिले कुणी? या उक्तीप्रमाणे खरच देव पाठिशी आहे.

   आमचा तो लग्नाचा वाढदिवस अगदी माझी मुले व आम्ही दोघे आमच्या पाच जणात साजरा केला.

  माझ्या लहान मुलांनी स्वतः जबाबदारी घेवून छान सजावट करून आम्हांला सरप्राईज दिले होते.

   आणि आज हा लग्नाचा वाढदिवस ३७ वर्ष पूर्ण झालेली मी पाहत होती.खूप अडचणीतून मी आज खंबीर उभी आहे.पाठिशी थोरले दीर, जावूबाई(माझी मावस बहीण) आहेत.आई आहेच.थोरामोठ्यांचे आशीश आहेत.

   तर मला खूप वर्षापासून वाटायचे आपण जे कमवतो त्यातील काही भाग वृद्धांसाठी द्यावा.कारण बर्‍याच घरात वृद्धांची दखल घेतली जात नाही.त्यांची आबाळ होते.त्यांची विचारपूस होत नाही. मानसिक खच्चीकरण केले जाते.

  खरे तर वृद्धांना काय लागते हो!थोडासा आहाराचा नीट दिनक्रम ठेवला की झाले.जराशा गप्पा मारल्या की ते खूश होतात.त्यांचा खाऊ ,पाणी त्यांच्या खोलीतच डबे भरून ठेवला की हवे तेव्हा त्यांना लहानमुलाप्रमाणे खाता येते. येता जाता "तुम्ही बरे आहात ना"? ही चौकशी करावी.इतक्याने हे वृद्ध खूश होतात.हा माझा स्वअनुभव आहे.

   बर!मला वृद्धाश्रमाला भेट द्यायची होती.त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते.आता जरा पैसे हाताशी लागयला लागल्याने मी यांना मदत करू शकले.

  " निवारा वृद्धाश्रम" धनकवडी या आश्रमला भेट दिली.महिनाभर पुरेल इतके धान्य दिले.तीस वृद्ध तिथे होते.

पेढे दिले.प्रत्येकाची विचारपूस केली त्यांच्यामधे जरा रमले.माझ्या समवेत पती वैभव ,मुलगी कोमल,सुनबाई श्रेया,माझ्या तीन नाती सोनाक्षी,समिक्षा,त्रिशिका होत्या .

   मी यांना प्रथमच भेटले पण आश्रूंचा बांध फुटून वाहू लागला..का कोणजाणे यात मला आई,सासूबाई, दादा,सासरे दिसत होते.

   मी व वैभवने स्वतः त्यांना पेढे भरवले त्यांनीही आमचे तोंड गोड केले भरभरून आशीश दिले.तोंडावरून हात फिरवून गोड पापी पण घेतली ..खरच हे क्षण किती अनमोल आहेत माझ्या जीवनात याचे मोलच नाही. माझ्या मुलीने व सुनेने पण त्यांचे आशीश घेतले.

  या आश्रमातील काही वृद्ध बेडरिडन होते.त्यांनाही भेटलो.खरच त्यांनीही आशीश दिले ते अंतरात खोलवर रूजले.

   सर्वांना भेटून मला जीवनातील एक वेगळा अनुभव मिळाला.

   मी अनाथमुलांना कपडालत्ता देते.तसेच गोशाळेसाठी पैसेही दान करते.पण हा अनुभव आजचा खूप खूप खूपप आनंद आत्मीक समाधान देवून गेला .

  असा आमच्या लग्नाचा वाढदिवस एका वेगळ्या जोशात साजरा केला.

  मनी जाहला आनंद

  वृद्धाश्रमातील वृद्धांचा

  घेतला मी मनी स्वानंद.....


  जीवन बहरू दे तयांचे

  हर्षाचे क्षण येवो जीवनी

  अनमोल मोल आहे जयांचे.....


Rate this content
Log in