निरभ्र आकाश
निरभ्र आकाश


आज शार्दुल जरा अस्वस्थ होता. आलेल्या निनावी फोन मुळे तर त्याची झोपच उडाली होती. दोनच दिवसांपूर्वी ज्या मुलीशी साखरपुडा झाला होता त्याच मुलीच्या बद्दल त्याला धक्कादायक बातमी मिळाली होती. त्यामुळे त्याच्या पाया खालची जमिन सरकल्याचा भास झाला व तो मटकन खाली बसला.त्याला तसं बघून तर ललिताताई (त्याची आई ) जवळ जात त्याच्या तब्येतीची चौकशी करु लागल्या. तेव्हा विशेष असं काही नाही अती दगदग, धावपळी मूळे जरा थकवा आलाय असं म्हणून त्याने वेळ मारुन नेली.
शार्दुल हा ललिता ताईंचा एकुलता एक मुलगा! खूप उच्च शिक्षित व रुबाबदार देखणा! एका नामवंत कंपनीचा शिस्तबद्ध व्यवस्थापक! त्याच्या वडिलांच्या (सर्जेराव पाटील) अकाली मृत्यू नंतर त्याला अनंत हाल अपेष्टा सोसून येथ पर्यंत आणलेलं! कमी वयात आलेल्या जबाबदारीच्या ओझ्याने अकाली प्रोढत्व आलेला असा पंचविशीचा तरुण युवक!
&nb
sp; आईला त्याच्या लग्नासाठी स्वत:हून आलेलं एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सुंदर व सुशिक्षित मुलीचं स्थळ पसंतीस उतरलं. आणि आठ दिवसांनी जिच्याशी जन्म भराची गाठ बांधली जाणार तिच्या बाबत हा अभद्र निनावी फोन. आईला खऱ सांगितले तर तिच्या स्वास्थ्याचं काय? मुलीच्या घरातल्यांना सांगितले तर तिच्या आयुष्याचं काय? हे असंख्य प्रश्न निर्माण झाल्या ने त्याने स्वत:च या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने ट्रू कालर ॲप द्वारे तो फोन ट्रेस आऊट केला तेव्हा तो फेक असल्याचे निदर्शनास आले व स्वत:च्या हुशारी ने त्याने आलेल्या संकटाचा सामना केला.अन्यथा घाईगडबडीत लग्नापूर्वी च गैरसमजामुळे ही दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली असती. त्या एका निनावी फोनचा छडा लावल्याने क्षणिक संशयाचे दाटलेले मळभ दूर होऊन विश्वासाचे निरभ्र आकाश दर्शन त्याला घडले होते.