शब्दसखी सुनिता

Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Others

नात्याला काही नाव नसावे

नात्याला काही नाव नसावे

3 mins
439


      अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाण म्हणजे मैत्री. आमची मैत्री ही लाॅकडाऊन सुरू झाला. तेव्हा वेळ छान जावा म्हणून काहीतरी वाचन कराव म्हणून मला स्टोरी मिरर हे ॲप मिळाल. मी स्टोरी मिररवर वाचन करायला लागले. लाॅकडाऊनच्या काळात आपल काम सांभाळून खुप छान वाचनाचा प्रवास सुरू

झाला.

कथा, कविता वाचुन खुप मनाला खुप छान वाटायच. मनाची मरगळ दुर व्हायची. कितीतरी वर्षांनंतर मि अस रोज वाचायला

लागलेही आणि आवड निर्माण झाली. त्याच ॲपवर मला पूनम भेटली. आमच्या मैत्रीला तिथुन सुरूवात झाली. त्या लाॅकडाउन

मध्ये आमची ओळख नि मैत्री झाली. आज आम्ही मैत्री नात्याने खुप जवळ आहोत नि मैत्रीच्या नात्याची ही विण कधी कट्ट झाली

समजलही नाही. मैत्रीचे नाते घट्ट तेव्हाच असते, जेव्हा त्यांच्यासोबत बोलताना तुम्हांला विचार करावा लागत नाही की आपण काय बोलावे आणि काय बोलू नये. आमच नात्यात आम्ही दोघींना खुप बोलतो आम्हांला एकमेकींना बोलताना वयाचा इतर गोष्टींचा काही फरक पडत नाही. मी तर ती मोठी असुन हक्काने पूनमच म्हणते. मला तिला पूनमच म्हणायला आवडत आणि पूनमही मला कधीही रागवत नाही. उलट मीच बर्‍याचदा रागवते पण ती खरच खुपच शांत स्वभाव आहे तिचा, खुप समजदार आहे. खुप काळजी करणारी आणि मनापासुन प्रेम करणारी मला मैत्रीण मिळाली खरच मी खुपच लकी समजते. 


     मैत्री हा शब्द जरी लहान असला तरी यात आपुलकी, प्रेम, विश्वास , भांडण , काळजी अश्या बर्‍याच गोष्टी दडलेल्या असतात म्हणुन तर मैत्री हे जगातील सर्वात स्पेशल नातं आहे. आयुष्य कितीही सुंदर असले तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. 


   लाॅकडाउन मध्ये पूनम आणि मी रोज स्टोरी मिररमुळे वाचन लेखनाच्या प्रवासातुन एकमेकांना भेटायचो. मला तिच्या कविता आणि कथा आवडत. मी तिची वाचक होते पण आता मैत्रिण आहे. आमची ओळख हळूहळू वाढत गेली. लाॅकडाउन मध्ये आम्ही इतक्यादुर असुन पण एकमेकींना विचारपूस करायचो. काळजी घ्यायला सांगायचो. आमच्या बर्‍याचश्या गोष्टी सारख्या आहेत. विचार आणि सवयी सेम आहेत. कधी कधी बोलताना सुध्दा  अगदी सारखच बोलून जात. अस वाटत की

आमच नातं खुप जन्मापासुन आहे आणि ते पुन्हा निभावण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेतला की काय अस वाटत. मी आजारी  असल्यावर ति मला काळजीने रोज काॅल, मेसेज करते. इतक्या दुर असुनही खुप काळजी घेते. मी मध्ये आजारी होते तेव्हापासुन तर रोजच सांगत आहे. बोलत आहे ,  " तु स्वतःची नीट काळजी घे जा "


      आमची अजुन भेट नाही झाली. आमच्या दोघींच्या शहरातील अंतर खुप असल तरी मनाने आम्ही मात्र खुप जवळ आहोत.

नेहमी सोबत आहोत. नवीन लेखनाला सुरूवात केली. प्रयत्न करतो इथे लिहण्याचा. जेव्हा आमचे इथे कुठल्याही स्पर्धेत विनर म्हणून आमची कथा येते तेव्हा खुप आनंद होतो. पूनम तर कविता, चारोळ्या आणि कथा खुप छान लिहते. रोजच्या

लाईफमधुन एकमेकींसोबत आम्ही लेखनाची आवड जोपासतो. मला तर ती नेहमी  लेखनाला प्रोत्साहन देते. कंटाळा केला तर मनोबल वाढवते. नेहमी सपोर्ट करते. खर तर तिच्यामुळे मी लिहू शकते. मि तिच्यासोबत एक नातं नाही तर खूप सारे नाते जगत असते. कधी मोठी बहीणीसारखी वागते, तर कधी आईसारखी प्रेमाने रागवते, सांगते. मैत्रिण

म्हणुन काळजी घेते. आमच्या नात्याला अस कुठल्याही नावाची गरजच नाही वाटत.


 आयुष्यात मैत्रीची साथ हवी. बरीच नाती जवळ असताना एकच नात जे खुद्द परिस्थितीने  उभ केल. ते म्हणजे मैत्रीच नात. कधी कधी  आयुष्यात कठीण काळ चालु असतो ना,  तेव्हा कोणी न कोणी व्यक्ती आपल्याला साथ देते, ती म्हणजे मैत्रीण. देव पण न जाणो  कोठून असे नाते जुळवितो, अनोळखी  माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी  ओळखत ही नसतो, त्यांना पार जिवाचे जिवलग  मित्र बनवतो. तशी तुझी नी माझी मैत्री आहे.

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुझी साथ कायम असावी. तु आहेस म्हणून  आयुष्यात कुठल्याही प्रसंगावार मात करू  शकते. तु नेहमी मला समजून घेतेस. सारख  काळजी घे किती वेळा सांगत असते. तु आहे म्हणून कुठल्याही गोष्टीच टेन्शन नसत. कितीही दूर असली तरी नेहमी जवळच  वाटणारी. कितीही दूर असलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्याही राहील. खरच प्रत्येकाला अशी एकतरी मैत्रीण असतेच. मैत्री असावी अशी, जन्मोजन्मीची साथ देणारी. मैत्री म्हणजे एक आधार , एक विश्वास असतो. एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी  मला मिळाली, तुझ्या रूपाने आपल्या मैत्रीची  साथ अशीच आयुष्यभर राहू दे.


पूनमसाठी या गाण्याच्या ओळी.

कधी हसणार आहे

कधी रडणार आहे

मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे.


तुझे सारे उन्हाळे 

हिवाळे पावसाळे 

मी सोबत हात कायमचा

तुझा धरणार आहे.


मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे.



Rate this content
Log in