नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

मुलगी

मुलगी

2 mins
1.5K


आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन तपासून निघुन गेले. काही त्रास होते काय ? अशी विचारण करून डॉक्टर आपल्या जागेवर गेली. तसे सासुबाई आणि डॉक्टर यांच्यात काही तरी कुजबुज बोलणे झाले. पण तिला काही त्यातले कळू दिले नाही. घरी आल्यावर चर्चा झाली. गर्भात मुलींचे अंश असल्यामुळे गर्भपात करावा अशी सासुबाईची ईच्छा होती. कारण तिला पहिली अडीच तीन वर्षाची एक सुंदर मुलगी होती. सध्या तिला दिवस गेले होते. सासुबाईची ईच्छा होती की यावेळी मुलगाच हवा असा हट्ट होती. कारण मुलगा हा वंशाचा दिवा असतो. तो जर नसेल तर आपल्या साऱ्या संपत्तीचे करायचे काय ? या समस्येमुळे तिला खुप त्रास होत होता. तो सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याला तिची समस्या कळत होती पण तो आईला समजावू शकत नव्हता. काही केल्या ती कोणाचे ऐकत नव्हती. ती जुन्या विचारसरणीची होती. त्यामुळे त्या दोघांना पण डोक्यावर टेंशन येत होते. पण गर्भपात करायचे नाही यावर ते दोघे ठाम होते. त्रास होत असल्यामुळे त्यादिवशी सकाळी सकाळी तिला दवाखान्यात भरती करावे लागले. काही वेळानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलींपेक्षा खुप सुंदर दिसत होती. तो तिच्या सोंबतच होता. मुलगी झाली हे कळताच सासुबाईचा चेहरा खुप उतरुन गेला. सासुबाई मुलगी जन्मली हे कळाल्यावर देखील दवाखान्यात आली नाही. त्यामुळे तिला खुप दुःख वाटले पण त्याची खंबीर सोबत होती म्हणून तिला काळजी वाटत नव्हती मात्र चिंता लागली होती पुढे काय होणार ? दिवस असेच पुढे सरकत होते. दोन्ही मुलीं चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. दोन्ही मुलीं खुप हुशार होत्या त्यामुळे चांगले गुण घेत प्रत्येक वर्गात उत्तीर्ण होत गेल्या. दोघांचे ही मेडिकलला प्रवेश मिळाला आणि एक मुलगी डोळ्याची डॉक्टर झाली तर छोटी मुलगी मेडिकल ऑफिसर झाली. सर्व काही आनंदात होते. दोघीचे थाटामाटात लग्न झाले. लग्न होऊन ते सासरी जरी गेले असतील तरी आई बाबा आणि आजी यांना ते विसरले नाहीत. कारण तसे संस्कार त्यांच्यावर झाले होते. दोन्ही मुलीं आजीवर खुप प्रेम करायचे एवढे असून देखील सासुबाई अजुन मोकळेपणाने बोलत नव्हत्या. पण एके दिवशी सासुबाईला डोळ्याचा त्रास झाला तेंव्हा तिला मोठ्या मुलींच्या दवाखान्यात एडमिट करण्यात आले. मोठ्या मुलीने आपल्या अभ्यासाच्या बळावर डोळ्याची यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी तिच्या आई बाबाला खुप आनंद झाला. डोळ्यांची समस्या सुटल्यामुळे सासुबाईचे डोळे उघडले आणि आज ती म्हणते


" मुलापेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी."


Rate this content
Log in