मुले ही देवाघरची फुले
मुले ही देवाघरची फुले
"मुले ही देवाघरची फुले" असे म्हटले जाते.
म्हणजे तितकी ती नाजूक, मासूम ,आणि निष्कपट असतात.
त्यांना प्रेमानेच वागवावे लागते. मुले म्हणजे चिखलाचा गोळा असतात, ज्याप्रमाणे कुंभार चिखलाच्या गोळ्याला ज्या प्रकारे आकार देतो ,त्या पद्धतीचा माठ तयार होतो. त्याच पद्धतीने मुले म्हणजे परमेश्वराने पाठवलेला अस्पर्शी रक्तामासांचा गोळाच असतो. आणि आपण त्यावरती जसे संस्कार करू, तसे ती मुले होतात.
घरामध्ये जर लहानपणापासून धार्मिक वातावरण असेल, श्लोक वगैरे म्हटले जात असतील, तर मुलगा देखील तसाच धार्मिक ,शुद्ध वाणीचा, संस्कारी, सत् प्रवृत्तीचा होतो.
पण जर घरामध्ये बाप दारू पिऊन येतो आहे, आईला शिवीगाळ करतो आहे, घरात मारामाऱ्या चालू आहेत, तेव्हा मुल देखील तशाच पद्धतीचे संस्कार घेतल्यामुळे, शिवीगाळ करू लागते .दुसऱ्या वरती हात उचलू लागते.
यामध्ये नेहमी दोन पोपटांची गोष्ट सांगितली जाते.
एक पारधी दोन पोपटांची पिल्ले पकडतो, ही एकाच आईची पिल्ले असतात. म्हणजे सख्खी भावंडे असतात ,त्यातील एक पिल्लू एक दरवडे खोर दरोडेखोर विकत घेतो, आणि दुसरे पिल्लू तो पारधी साधूला भेट देतो.
जे पिल्लू दरोडेखोरा कडे लहानाचे मोठे होते ,ते धरा, हाणा, मारा ,पकडा, लुटा, असे ओरडत राहते ,आणि जे पिल्लू साधूने पाळलेले असते ,ते मात्र संस्कृत श्लोक बोलत असते. पाहुण्यांना सुस्वागतम करत असते.
अशाच पद्धतीने मुलांवर देखील संस्काराचे परिणाम होतात
आजकाल मुलांवरती अभ्यासाचा आणि शाळेचा खूप ताण येत आहे.
त्यांच्या वयाच्या मनाने, एकदा का त्यांच्या मानेवरती शिक्षणाचे जोखड टाकले की ,डोळ्याला झापडं बांधून सतत धावण्या व्यतिरिक्त त्यांच्या हातात काही नसते. सतत मार्कांची चढाओढ, त्यामुळे अगदी चांगल्या शाळेत प्रवेश करण्यासाठी सुद्धा, मुलांना लहानपणापासूनच सिनियर केजी ज्युनिअर केजी मध्ये पाठवून, त्याच्यावरती अभ्यासाचे बर्डन दिले जाते. आईबाप घरात सतत घोकं पट्टी करून घेतात .
एवढ्या छोट्या मुलांचे इंटरव्यू घेतले जातात.
ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या असून त्या बंद झाल्या पाहिजेत.
पुढे देखील मुलाने एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत .आपल्या मुलाने गाण्यात, नाचण्यात, अभिनयात ,कशात तरी नाव कमवावे असे आई-वडिलांना वाटत असते. आणि यावेळी मुलांचे खूप शारीरिक आणि मानसिक शोषण होत राहते. बऱ्याच वेळा मुले आपल्या आई-वडिलांकडे या गोष्टी व्यक्त करू शकत नाहीत .त्यामुळे आई-वडिलांनी त्यांच्या शारीरिक ताकतीचा आणि बुद्धीचा विचार करूनच त्यांना त्या त्या अभ्यासक्रमामध्ये ढकलावे. उगाच शेजाऱ्याच पोर गेलं म्हणून माझंही जावं असा विचार करू नये.
आजची पिढी ही उद्याची भावी नागरिक आहे.
ती मनाने खंबीर झाली पाहिजे कमकुवत होता कामा नये.
@@@@@@@@@@@@
