The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Ajay Nannar

Others

2  

Ajay Nannar

Others

मुक्त

मुक्त

2 mins
50


मेंदूला चालना देण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी सृजनशील गोष्टी करण्यास भर दिला जातो. सध्या लॉकडाऊनमुळे बऱ्यापैकी निवांत आणि हक्काचा वेळ मिळाला आहे. यावेळेत घर बसल्या नवनवीन आणि सोप्या गोष्टी करु शकता. कलात्मक टाइमपास कसा करु शकता, याच्या काही भन्नाट कल्पना आजच्या लेखातून जाणून घेऊ या...


बुटांना द्या नवा लूक

तुम्ही जुने बूट घालून कंटाळले असाल तर फावल्या वेळेत त्यांचा मेकओव्हर करा. त्यांना तुमच्या आवडीप्रमाणे नवा लूक द्या. आकर्षक रंगसंगती आणि विविध आकारांच्या ब्रशेसचा वापर करून तुमच्या स्नीकर्स आणि कॅनव्हास बुटांना हट के लूक देऊ शकता. शूज डिझायनर कनिका पटेल सांगते की, 'सध्या पॉप आर्ट, इल्युस्ट्रेशन यासारख्या कलांना जास्त मागणी आहे. तसंच तुमच्या आवडीचा सुपरहिरोजचं चित्र रेखाटू शकता. याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. तसंच कॅनव्हास शूजवर फॅब्रिक रंगाशिवाय चमकी किंवा विविध आकारांचे खडे वापरुन नक्षीकाम केलं तर अधिक आकर्षक दिसेल'.


आकर्षक कागदी पिशव्या

विविध कार्टून पात्रांच्या आकाराच्या कागदी पिशव्या बनवणं सध्या ट्रेंडमध्ये आहे. घर बसल्या अत्यंत सोपा आणि मजेशीर सृजनशील पर्याय आहे. यात तुम्ही घरातील लहानग्यांनाही सहभागी करुन घेऊ शकता. रंगीबेरंगी कापडाच्या पॅचचाही उपयोग करु शकता.


पानावर सुबक नक्षी

झाडांच्या पानांवर रंगकाम करून तुम्ही अनेक सुंदर कलाकृती तयार करू शकता. यासाठी झाडांची पानं तोडण्याची गरज नाही. वाळलेली, सुकलेली, गळून पडलेली पानं वापरु शकता. पान वाळल्यावर त्याला विविध आकार येतात. त्याचा सृजनशील उपयोग होऊ शकतो. तसंच रंगवलेलं पान कागदावर किंवा पुठ्ठ्यावर चिकटवून त्याच्याभोवती चित्र रेखाटू शकता. त्याची फ्रेम केल्यास घर सजवण्यास मदत होईल.


आठवणींचा कोलाज

प्रत्येकवेळी तुमचा अल्बम काढून फोटो बघण्यापेक्षा तुमच्या आवडत्या फोटोंना अल्बममधून काढून दोरीच्या साहाय्यानं भिंतीवर लावा. यामुळे तुमच्या घराला नवा लूक येईल आणि आठवणी डोळ्यांसमोर राहतील. अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारं काम आहे. यावर दिव्यांच्या माळा सोडल्यास अधिक आकर्षक वाटेल.

लिखाण करा!


सद्यस्थिती गंभीर असून सतत त्याचा विचार केल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसोपचारतज्ञ पवन सोनार यांच्या मते, ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांनी या काळात जास्तीत जास्त लिखाण केलं पाहिजे. तुमचे विचार, मतं, कटू प्रसंग आणि त्याला कशाप्रकारे सामोरं गेलात हे कागदावर उतरवा.


Rate this content
Log in