मराठी असे आमची मायबोली
मराठी असे आमची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
शिवाजी असे आमचा बाळराणा
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवितं
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशांची जनाईची
माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची
बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची
डफ तूणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी
मुजर्याची मानकरी वीरांची ही मायबोली
अशी माझ्या मराठीची महती.
जन्माला आल्याबरोबर बाळ पहिला शब्द बोलते आई, तो आपल्या मातृभाषेतूनच जरी प्र के अत्रे यांनी इंग्रजीला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली असली तरीही बालक आपल्या आईच्या दुधावरच लहानाचा मोठा होतो व ते दूध म्हणजे आपली मातृभाषा माय मराठी
खरे तर मुलांना शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे तर ते त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहते अच्युत गोडबोले जयंत नारळीकर यांच्यासारख्या विभूती मराठीतूनच शिकलेल्या आहेत व पुढे मोठ्या झाल्या आहेत.
शिवाय आपल्या मराठी मध्ये इतकं विपुल साहित्य आहे तिच्यासाठी तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे
माणूस अती रागात व अती आनंदात आपल्या मातृभाषेतच बोलतो त्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो की राजा रामदेवराय यांच्या दरबारात एक विद्वान येतो व तो माझी मातृभाषा ओळखून दाखवा असे आव्हान देतो दरबारातील भलेभले मानकरी विद्वान बुद्धिमान माणसे त्याच्याशी विविध भाषांमध्ये बोलतात व तो सर्व प्रश्नांची त्या त्या भाषा मध्ये अस्खलितपणे उत्तरे देतो व दरबारातील कोणीही त्याची मातृभाषा ओळखू शकत नाही अशावेळी तेनालीरामा दोन दिवसांची मुदत मागून घेतो व त्या विद्वान व्यक्तीला झोपून न देता दोन दिवस सतत रात्रंदिवस प्रश्न उत्तरे विचारत ठेवतो व त्यानंतर तो झोपल्यावर त्याच्या तोंडावरती गार पाणी मारतो त्याबरोबर तो माणूस तेलुगु भाषेमध्ये शिव्या देत उठतो दुसऱ्या दिवशी दरबारात तेनाली रामा त्याची मातृभाषा तेलगू आहे हे सांगतो असा असतो मातृभाषेचा महिमा.
जर आपण परदेशात किंवा महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात गेलो आणि तेथे कोणी मराठीत बोलणारे भेटले तर आपल्याला अत्यानंद होतो. आता माध्यमांमुळे जग जवळ आलेले आहे आहे त्यामुळे आपली मराठी भाषा सर्वदूर पोहोचलेली आहे पण महाराष्ट्रात मात्र तिचे अवमूल्यन होत आहे
महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण, व प्राबल्य व बंद पडणाऱ्या मराठी शाळा, ही एक मोठी चिंतेची बाब आहे अगदी गरीबातील गरीब व्यक्तीला सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकवायचे असते तर चांगली नोकरी मिळते असा समज आहे लोकांच्या मनातील हा न्यूनगंड प्रयत्नांनी दूर केला पाहिजे आताची इंग्रजाळलेली तरुण पिढी भाषा बोलताना देखील अर्धे शब्द त्यामध्ये इंग्रजीतले घुसडतात. मुंबईत तर दोन मराठी माणसे एकमेकाशी आधी हिंदीत बोलतात ,तर मोठ्या पार्ट्या मधून मराठी बोलणारा कडे तुच्छतेने बघितले जाते. उच्चविद्याविभूषित माणसांना तर इंग्लिश मध्ये बोलण्यात धन्यता वाटते .फक्त कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी यांना मराठी भाषेचा कळवळा येतो.
भाषाशुद्धी व इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द देणाऱ्या सावरकरांचे मराठी भाषेबाबत चे योगदान मोठे आहे ते आपण विसरू शकत नाही आणि जरी कितीही भाषांचे आघात, भाषांची सरमिसळ, मराठी भाषेत झाली तरी तिला मरण नाही कारण आजही ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ,अमृतानुभव इतक्या तन्मयतेने आवडीने नवीन पिढी वाचते.
त्यात आमच्या मराठीच्या उपभाषा किती ! मालवणी, कोंकणी,आग्री ग्रामीण शहरी पुण्याची मुंबईची नागपूरची आदिवासी अहिराणी अशा विविध भाषांनी नटलेली आहे
अभंग ओव्या लावण्या फटका, पोवाडा, भक्ती गीत, भावगीत, प्रेम गीत अशा विविध अलंकारांनी आणि वस्त्रा उपवस्त्रांनी शृंगार लेली माझी मराठी भाषा ठेचात उभी आहे
ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे ना,
माझ्या मराठीचे बोल कौतुके
अमृतातेही पैजा जिंके