Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

मोगांबो कभी खुश नही होता

मोगांबो कभी खुश नही होता

3 mins
276


समस्तीपुर, नावाच्या एका नगरीमध्ये ठकसेन नावाचा राजा राज्य करीत होता. 

हा राजा , परंतु कायम स्वभावाने असंतुष्ट होता. खर्जातला आवाज, आणि बटबटीत डोळे, त्यामुळे तेथील जनता त्याला घाबरून पाठीमागे "मोग्याम्बो" म्हणत असे. तसा तो क्रूर नव्हता परंतु सर्व गोष्टींची जास्ती हाव होती .त्यामुळे राज्यातील जनता त्याला घाबरुनच होती. सावकार शेटजी वगैरे पैसे वाले लोक राजाच्या समोर जायला घाबरत , कारण राजाने आपला पैसा मागितला तर.

 पैसे मागण्यासाठी राजाला काहीही कारण पुरत असे. कधी स्वतःचा वाढदिवस, कधी राणी साहेबांचा वाढदिवस, कधी राजकन्येचा वाढदिवस आणि काहीही कोणतेही कारण देणगी देण्यासाठी राजाला पुरत असे. 

राजाला राजवाड्यात जाऊन देणगी द्यावी लागे. कधी कलाकार लोक त्याच्या दरबारी आपली कला पेश करायला गेले, तरी त्यांना असाच वाईट अनुभव येत असे. 

एकदा दुसर्‍या राज्यातून आलेली नर्तकी आपल्या नृत्याचे उत्तमोत्तम तोडे पेश करून दमली. परंतु राजाकडून काही दाद मिळे ना किंवा वाहवा मिळेना. राजा फक्त एकच वाक्य बोले, 

"मोग्याम्बो कभी खुश नही होता" शेवटी बिचारी नर्तकी नाचून नाचून चक्कर येऊन पडली. तिला तिची ठरलेली बिदागी मिळाली. परंतु पुन्हा कधीही या राज्यात यायचे नाही असे ठरवून ती गेली. तसेच एकदा दुसऱ्या राज्यातील एक गायक आपली कला पेश करण्यासाठी ठकसेन च्या दरबारामध्ये आला त्याने आपल्या गायकीमध्ये नाना चीज ऐकवल्या, परंतु राजाला त्यातले काही कळत नव्हते परंतु तो उगाचच "मोग्याम्बो कभी खुशी नही होता" असे म्हणत राहिला जेव्हा जेव्हा गायक दाद मिळेल या अपेक्षेने राजाकडे पाहत असे, तेव्हा तेव्हा राजा " मोग्याम्बो कभी खुश नही होता" असे म्हणत होता शेवटी गाणे गाऊन गाऊन तो गायक बेशुद्ध पडला. नंतर त्याचा घसा बसला. नंतर राजाबद्दल एकमेकांच्या तोंडून कुप्रसिद्धी सगळीकडे पोहोचली. जनतेने कितीही कर भरला तरी राजाला अजून हाव असे. 

ही प्रसिद्धी ऐकूनच या राजाच्या दरबारामध्ये एका परराज्यातून एक ज्योतिषी आला आणि त्याला भविष्य सांगण्यास सुरुवात केली. राजाच्या जन्मापासून आज तागायत घडलेल्या घटना त्याने पूर्णपणे विस्ताराने सांगितल्या आणि पुढील भविष्यात सांगणारच होता. परंतु राजाचे आपले एकच पालुपद "मोग्याम्बो कभी खुश नही होता" 

मोग्याम्बो कभी खुश नही होता. 

शेवटी ज्योतिषी चिडला आणि त्याने शापवाणी उच्चारली. राजा मी तुझे भविष्य बदलू शकतो . इथून पुढे 21 दिवसात तुझ्यावर संकट येईल. त्यानंतर मात्र राजाने घाबरुन पाय धरले आणि ज्योतिषाला उषा:प मागितला तेव्हा या ज्योतिषाने जर होणाऱ्या घटनेच्या विरुद्ध तू बोललास तरच तुझ्यावरचे संकट टळेल असे बोलून ज्योतिषी निघून गेला. त्यानंतर आपण काय करावे हे राजाला समजेना आणि वेळ घालवण्यासाठी तो आपले मोजके सैनिक घेऊन जंगलात शिकारीला गेला. 

त्याच्यासमोर वाघ दिसला, नेहमीप्रमाणे हा बोलला " "मोग्याम्बो कभी खुश नही होता"

 त्या बरोबर तो वाघ एकदम समोर आला, 

पुन्हा राजा बोलला "मोग्याम्बो कभी खुश नही होता" 

 त्याबरोबर एकदम वाघाने त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याला आडवे पाडले आणि आता त्याच्या गळ्याला तोंड लावणार तेवढ्यात, सैनिकांनी ओरडून सांगितले, महाराज विरुद्ध बोला, महाराज विरुद्ध बोला, तेव्हा त्याला आठवले आणि तो जोरात ओरडला *मोग्याम्बो खुश हुआ! त्याबरोबर त्या वाघाने त्याला सोडले वास घेतला आणि वाघ निघून गेला. आणि त्यानंतर मात्र राजाला एक धडा मिळाला. त्यानंतर त्याने आपले वागणे सुधारले आणि लोकांना योग्य प्रकारे बक्षिसी बिदागी देऊ लागला. त्यानंतर त्याने स्वतःचे ब्रीद वाक्य बदलले आता तो मंत्र म्हणतो

" मोग्याम्बो खुश हुआ" असे म्हणतो.


Rate this content
Log in