Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

नासा येवतीकर

Children Stories Children


3  

नासा येवतीकर

Children Stories Children


मोबाईल वेडा राजू

मोबाईल वेडा राजू

4 mins 247 4 mins 247

राजू जेमतेम तीन वर्षांचा मुलगा. पण त्याला मोबाईलचं एवढं वेड होते की, मोबाईल शिवाय तो जेवत नव्हता आणि मोबाईल शिवाय झोपत ही नव्हता. अशी त्याची स्थिती होती. त्याच्या या मोबाईल वेडेपणाला त्याचे आई-वडील पुरते कंटाळून गेले होते. काय करावे हे त्यांना काहीच सुचत नव्हते. राजूला मोबाईलचे वेड काही आपोआप लागले नाही. तर राजुच्या आईनेच त्याला ते वेड लावलं होतं. झालं कसं ...!

राजू दोन वर्षांचा असताना एके दिवशी तो खूप रडू लागला. किती ही समजावून सांगितले, चॉकलेट जरी दिले, तरी तो रडायचं काही थांबेना. कारण राजूचे वडील मोबाईलवर काही तरी पाहत होते त्याचवेळी ते राजू देखील पाहत होता. त्याला मोबाईल हे टीव्हीसारखी मजेदार वाटलं म्हणून तो मोबाईलसाठी रडत होता. राजुचे बाबा त्याला मोबाईल देण्यास तयार नव्हते पण राजूची आई विनवणी करू लागली, ' अहो, तो खूप रडत आहे, द्या की दोन मिनिटांसाठी. तो गप्प झाला की देतो तुम्हाला.' यावर राजुचे बाबा आईला म्हणतात, ' नको, मोबाईलचे फाजील लाड नको, पुढे आपणाला अवघड जाईल.' यावर त्याची आई समजुतीच्या स्वरात म्हणते, ' नाही हो, नंतर नाही मागणार तो, आताच्या साठी द्या.' हो ना करत राजूला मोबाईल मिळते. मोबाईल हातात घेताच तो आनंदी होतो, त्याचे रडणे थांबते पण मोबाईलवर काहीच दिसत नाही. म्हणून पुन्हा तो रडायला लागतो. यावर त्याची आई म्हणते,' अहो युट्युबवर एखादे गाणे लावून द्या की, त्याच्या नादात जरा जेवलं तर जेवलं.' बरं म्हणून राजुच्या बाबांनी युट्युबवर लहान मुलांचे आज मंगलवार है हे गीत लावून दिलं. त्याचे चित्रआणि संगीत ऐकत ऐकत राजू छान जेवण केला आणि काही वेळात झोपी पण गेला.

आता ही एका दिवसाची घटना नव्हती तर रोजची होती. राजुचे बाबा घरी येईपर्यंत राजू जेवण ही करत नव्हता त्यामुळे त्याला झोप ही लागत नव्हती. ' बाबा कधी येतात ? ' म्हणून सारखा आईच्या मागे लागायचा. बाबा घरी आले की पहिलं त्याच्याकडून मोबाईल काढून घ्यायचा आणि मग त्याचे जेवण सुरू व्हायचे. राजुच्या रोजच्या या बाबीला त्याचे बाबा देखील कंटाळले होते. म्हणून एके दिवशी बाबांनी दुसरा नवा फोन विकत आणला. जुना फोन राजूच्या आईच्या स्वाधीन केला आणि म्हणाला, ' माझा फोन मागायचा नाही, हे आईजवळ राहील, आईला मागायचं.' राजूला आता चोवीस तास मोबाईल बघायला मिळू लागलं. आई घरकामात असलं की राजू मोबाईलवर गाणे ऐकायचा आणि हळूहळू तो मोबाईल गेम खेळायला शिकला होता. त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष त्या मोबाईलवरच असायचे. त्याचे मोबाईलवर तासनतास खेळणे पाहून राजुच्या आई-वडिलांमध्ये वाद व्हायचे. राजूला मात्र त्याचे काहीच वाटायचे नाही.

राजूला जे मोबाईल वेड लागलं ते सोडवावे कसे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. काय करावे ? त्यांना उत्तर सापडत नव्हते. त्यांचा एक मित्र होता, जो की अनेकवेळा राजुच्या आईबाबांना संकटकाळात मदत केले होते ? त्यांना फोन करून राजुची समस्या सांगितली. त्यावर त्याने एक सुंदर आयडिया दिली जे की, खूप काम करून गेली. त्याच्या कल्पनेनुसार आई राजूला घेऊन बाजारात गेली. भाजीपाला घेता घेता कुणीतरी तिचा मोबाईल चोरला. ती बाजार आटोपून घरी आल्यावर राजुच्या बाबांना फोन लावावे म्हणून आपल्या पर्समध्ये मोबाईल शोधू लागली पण मोबाईल काही सापडेना. त्यावर आई राजूला म्हणते, ' राजू तुझ्याजवळ आहे का मोबाईल ? ' तो म्हणतो, ' नाही, मोबाईल माझ्याजवळ नाही. बाजारात जाताना मी तुला दिलं होतं पर्समध्ये ठेवायला.' ' हो बरोबर आहे, तू दिलं होतंस, मला वाटतं मोबाईल चोरीला गेला आहे. तुझे बाबा आल्यावर आपणाला खूप शिव्या देणार आता.' राजूला देखील मोबाईल हरवल्याचे खूप दुःख झाले.


सायंकाळी राजुचे बाबा घरी आले. राजू आज चुपचाप बसला होता. त्याच्या हातात मोबाईल नाही हे पाहून त्याच्या मित्राची आयडिया काम करत आहे असे दिसत होते. राजू आज काहीही न म्हणता चुपचाप जेवण करून घेतला आणि झोपी पण गेला. एवढा महाग मोबाईल हरवलं म्हणून राजुच्या बाबांनी खोटे खोटे आईला चार शब्द सुनावले. राजूला पण वाईट वाटले. राजूचा पहिला दिवस मोबाईलविना गेला. मित्राची आयडिया कामाला आली. राजू हळूहळू मोबाईलपासून दूर झाला. त्याची मोबाईलची सवय तुटली. आता तो मोबाईलविना सर्व कामे करू लागला म्हणून राजुच्या बाबाने तो लपवून ठेवलेला मोबाईल काढण्यास सांगितले तेंव्हा राजुची आई म्हणाली, ' अहो, खरोखरच आपला मोबाईल हरवला आहे, मी लपवून ठेवलं नाही.' हे ऐकून राजुच्या बाबांना जरा झटका लागला पण राजुची सवय तुटली हे महत्वाचे म्हणून त्यांनी तिकडे कानाडोळा केला. पुन्हा विचारलं, ' तुला नवीन मोबाईल घेऊन देऊ का ?' यावर राजुची आई म्हणाली, ' जे झालं ते चांगल्यासाठी झालं, नको मला मोबाईल, तुमच्या मोबाईलवरच काम भागेल माझं.' दोघेही आनंदात झोपी जातात.


Rate this content
Log in