मन
मन


मन या विषयावर लिहायचं म्हटलं तर ते काही चारोळीत मावत नाही ,आणि म्हणून चार ओळीत लिहायला मन मानत नाही. मनाचा व्याप केवढा? मनाचा पसारा केवढा? या मनाविषयी भल्याभल्या पंडितांनी लिहून ठेवलेले आहे. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले त्यामध्ये विविध पद्धतीने मनाला समजावले. हे मना तू भक्तिमार्गाने चाल तर तुला श्रीहरी मिळेल. जगातील सर्व वाईट गोष्टी सोडून दे. चांगल्या गोष्टीचा अवलंब कर. मनात दुष्ट वासना काबूत ठेव, कोणाबद्दल पापबुद्धी ठेवू नको. हे मना तू निती सोडू नकोस. मना तू धारिष्टपणे वाग. लोकांचे बोलणे सोसून देखील तू तू नम्र रहा. अशा रीतीने स्वतःच्या मनाला आणि सज्जनांना उपदेश केला आहे. बहिणाबाई चौधरी यांनी मनाबद्दल खूपच छान विश्लेषण केलेले आहे.
मन वढाळ वढाळ
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येते पिकावर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
पाण्यावरल्या रे लाटा
मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचु साप बरा
त्याले उतारे मंतर
मन येवढं येवढं जसा
खसखशीचा दाना
मन केवढ केवढ आभायात बी मायेना
मनाच्या साऱ्या अवस्था, साऱ्या गोष्टी, या
त विशद केलेल्या आहेत. मन कसं ओढाळ आहे नको असणाऱ्या गोष्टीसाठी ते कसे ओढ खाते जसं एखाद जनावर किती हाकलं तरी पुन्हा पुन्हा येऊन पिकांमध्ये तोंड घालतं. मन एवढं जहरी आहे की एखादा विंचू साप पण बरा, त्याच्यावर एखादा मंत्र टाकल्यावर तरी ते जहर उतरतं. पण माणसाच्या मनात एकदा जहर भरलं ते मृत्यूपर्यंत जात नाही.
अजून कोणीतरी सांगितलेला आहे
"मन करा रे प्रसन्न सर्व सुखाचे कारण"
जरी माणसाच्या अजून कोणा कवींनी सांगितलेले आहे
माझ्या मना बन दगड
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार
एवढे यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरी मनाचा तोल ढळू देता कामा नये
जर तुमचे मन प्रसन्न असेल तर सर्व गोष्टी सुसह्य होतात
ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेला आहे मनाचिये गुंफी गुंफियेला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला
शेवटी माणसाच्या राग लोभ द्वेष मोह मत्सर माया या सर्व गोष्टींची मनाचा अतिशय जवळचा संबंध आहे
चांगली असो किंवा वाईट असो कोणतीही गोष्ट प्रथम मनात येते मग ती आपण डोक्यात उतरवतो आणि मग ती कृतीत आणतो
म्हणून त्या जगनियंत्याला आळवू या
जे पूर्ण कृपेने भरले ते मन निष्ठूर का केले