STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Others

3  

दिपमाला अहिरे

Others

मी तुझी आई की,तु माझी आई आहे.

मी तुझी आई की,तु माझी आई आहे.

3 mins
223

" आई तु हे काय करतेय? ,तुला सांगीतले होते ना मी पलंगावरून खाली उतरायचे नाही? चल झोप पाहु इकडे ..अजुन तुझ्या अंगात ताप आहे बघ! थोडं माझं दुर्लक्ष काय झालं ?लगेच ऊठुन कुठे चालली होती? तुला काही लागलं तर मला आवाज दे.बोलली होती ना मी तुला ? तरी ऐकायचं नसतंच का तुला माझं काही?"  नेहा आपल्या आईला रागावत होती.

"अगं नेहा बाळा बरं वाटतंय मला आता आणि तुझ्या परीक्षा आहेत ना उद्या पासून तुला अभ्यास ही करायचा आहे, आणि हे काय किती ओरडतेस माझ्या वर?? मी तुझी आई आहे का तु माझी आई?? इतकी काळजी करते तर माझी?"

" हो आई मी आता इतकी मोठी तर झालीच आहे की, तुझी काळजी घेऊ शकेल ,तु सुध्दा जपलसं ना मला एकटीने एवढीशी ची एवढी मोठी केलीस ना काळजीने!" अमिता आपली मुलगी नेहाचे बोलणे ऐकून भुतकाळात जाते.


अमिता,राकेश नेहा असे त्यांचे आनंदी कुटुंब होते, नेहा नुकतीच दोन महिन्यांची झाली होती. अमिता ने राकेशला आणि सासुबाईंना आठवण करून दिली.


" आई पहिलं बाळ जेव्हा जन्मताच दोन दिवसांनी वारले होते, म्हणून दुसऱ्यांदा दिवस राहिले तेव्हा मी कुलदेवी ला नवस बोलले होते.यावेळी कुठल्याही विघ्ना शिवाय सर्व सुखरूप होऊ दे. माझ्या होणाऱ्या बाळाला घेऊन मी नवस फेडायला येईल!"

"आता नेहा पुर्ण दोन महिन्यांची झाली आहे, आपल्याला कुलदेवी च्या दर्शनासाठी जायला पाहिजे."

सासुबाई आणि राकेश लगेच तयारी लागले, सासुबाई ने आपल्या दोन्ही मुली आणि जावायांनाही बोलावुन घेतले,नेहाचे आई-वडील भाऊ बहिण असे सर्व मिळून कुलदेवी चा नवस फेडायला जाणार होते.राकेश ने त्यासाठी दोन गाड्या बुक केल्या होत्या. त्यांच्या राहत्या गावापासून दोन तासाच्या अंतरावर कुलदेवी चे मंदिर होते.म्हणुन राकेश आणि त्याचे मोठे भावोजी दोघे बाईक ने जाणार होते.

राकेश च्या आईने जावयाला आपल्या सोबत गाडीत येण्याचा आग्रह केला पण,त्यांनी ऐकले नाही राकेश एकटा जाईल त्यापेक्षा आंम्ही दोघे सोबतच येतो म्हणाले.

कुलदेवी दर्शन,मानलेला नवस ,प्रसाद, जेवणाचा कार्यक्रम सारं काही व्यवस्थित पार पडले होते. अमिता आणि राकेश ला आता जरा बरे वाटले. परत येतांनाही इतर सर्व मंडळींना दोन्ही गाडींमध्ये व्यवस्थित बसवुन राकेश ने पुढे पाठवले आणि मागुन बाईक वर राकेश आणि त्याचे भावोजी निघाले.

थोड्याच अंतरावर एक वळण लागले राकेश ने त्या वळणावर आपली गाडी फिरवली तसा अचानक समोरून ट्रक आला आणि बाईकला जोरदार धडक दिली. राकेश आणि त्याचे भावोजी दोघेही जागेवरच मरण पावले होते.

राकेशच्या आईने नेहा आणि अमिता दोघींनाही या गोष्टी चा दोष देत घराबाहेर काढले. " ही मुलगी नेहा ही बापासाठी काळ बनुन आली, हिच्या मुळेच माझा मुलगा आणि जावाई दोघांना मी गमावून बसले, तुम्हां दोघी मायलेकींना माझ्या घरात जागा नाही, चालत्या व्हा माझ्या घरातुन."

अमिता चे आई वडील दोघींना ही आपल्या सोबत घेऊन गेले. तेव्हा पासून एवढ्याशा दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन अमिता एकट्याने आयुष्य जगत होती, आई-वडील होते मदतीला पण नेहाला मात्र पदोपदी आपल्या वडिलांची कमतरता जाणवायची. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यावरून अचानक बापाचे छत्र हरवुन गेले होते.

अमिता राकेश च्या जागेवर नौकरी ला लागली होती. सासरच्या लोकांच्याजवळ जाण्याचा त्यांच्या बरोबर राहण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला अमिताने पण सासुने दोघींनाही कधीच जवळ केले नाही.

आई-वडील आणि नातेवाईकांने अमिता ला दुसरे लग्न करण्यासाठी बरेच वर्षे आग्रह केला पण, अमिता ने आपली मुलगीच आपल्या साठी सर्वकाही आहे हेच मानुन आपले पुर्ण आयुष्य काढले होते.

नेहाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम देण्याचा प्रयत्न करत होती. आयुष्य भर मायलेकी एकमेकांना जपत, काळजी घेत जगत होत्या.

आज नेहा एकवीस वर्षांची झाली वकीलीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. लहानपणापासून आईची धावपळ,खस्ता सर्व गोष्टींचा संघर्ष तिने पाहिला आहे, म्हणून आता ती आईला खूप जपते, वेळ पडली तर रागावतेही आणि आई तिला नेहमीच हसण्यात विचारते "मी तुझी आई आहे का तु माझी आई?"....


(वरील कथा आणि कथेतील पात्र पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा.

कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा कथेचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव असल्याने कथा शेअर करायची असल्यास नावासहीत शेअर करा, अजुन नवनवीन कथा वाचण्यासाठी नक्कीच फॉलो करा)


Rate this content
Log in