महिला जगत
महिला जगत
मुलगा व मुलगी समान असे आजचे ब्रीदवाक्यच झाले आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रभागी आहेत. 'पूर्वी चूल आणि मूल ' इतकेच स्त्रीला माहित होते. घराच्या चार चौकटी सोडून ती बाहेर पडू शकत नव्हती. पण आज महिलेला ,मुलींना प्रत्येक ठिकाणी मानाचे स्थान दिले आहे. पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई यांना खूप हालअपेष्टा सहन करून मुलींच्या शिक्षणासाठी झगडावे लागले.पण आज ममुली या माईमुळे आनंदात शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत.
पहिली महिला डाॅ.आनंदीबाई जोशी याचेही खूप अभिमान, कौतुक वाटते. खरंच किती महान कार्य केले यांनी. पहिली अंतराळवीर कल्पना चावला... हिचाही अभिमान वाटतो. पण आनंद घेता आला नाही याचे दुःख वाटते. शिवछत्रपतींची माता जिजामाता काय घडवले यांनी मुलाला. वंदन त्या मातेला.
अहिल्याबाई होळकर यांची कालच स्मरण झाले. झाशीची राणी लढवैय्यी... अशी अनेक उदाहरणे देता येतील, आणि सध्या काव्य क्षेत्रात सहभागी होणार्या माझ्या मैत्रिणी..यांच्याबद्दल जरा बोलावेसे वाटते.मी अशा अनेक समूहावर आहे.आतल्या समूहातील भगिनी पण तिथे दिसतात.
प्रत्येक समूहात लिहिताना खरेतर आमची त्रेधातिरपीट उडते. कारण घर, नोकरी, मुले, सासूसासरे यांची जबाबदारी सांभाळताना लेखनाकडे तसे दुर्लक्ष होत होते. पण या ॲडमिन महोदयांनी सर्व महिला जगताला लेखनाची उत्तम संधी दिली आहे, स्टेज दिले आहे, वेळ दिली जाते पण ही वेळ सांभाळताना होणारी घाई... मग महिलांचे म्हणणे.. सर, ताई जरा वेळ वाढवून द्या ना.
खरंच विविध उपक्रमांमुळे लेखनाची सवय होते. विविध विषयावर लिहिले जाते. प्राविण्य प्राप्त होते. आज नंदिनीताईंनी मनातले बोलण्याची संधी दिली. मनःपूर्वक धन्यवाद. मा. शंकर सर, सचिन सर आपलेही मनःपूर्वक धन्यवाद...
आपल्या कार्याला वंदन करते व थांबते.
