Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

महात्मा फुले लेख

महात्मा फुले लेख

1 min
143


  *म.ज्योतिबाने पहिली मुलींची शाळा काढली. त्या काळी मुलींना घराबाहेर पडणे कठीण* *होते.तरशिक्षण शिकणे तर अवघडच होते.पण याच शिक्षणाने होणारे मानवी विचारातील बदल म.फुलेंनी पाहिले.एक स्त्री पूर्ण घर साक्षर करू शकते हे त्या वेळी त्यांनी अनुधवले होते.*

   *त्या काळात मुलींना शिक्षण देणे ,साक्षर करणे फार कठीण होते.समाजाला हे मान्य नव्हते.अनेक हाल अपेष्टा सोसून त्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात म.फुले वाड्यात काढली.*

  *सावित्रीबाई त्यांची अर्धांगिनी हिलाही शिक्षित केले व नंतर सावित्रींना हाताशी घेवून मुलींच्या शिक्षणाचा ज्ञानदीप पेटवला.अत्यंत त्रास झाला.सावित्रीला दगड,शेणाचे गोळे मारले गेले.पाणी अंगावर टाकले गेले.पण त्या डगमगल्या नाहीत.त्यांनी म.फुलेंना उत्तम साथ दिली.*

  *आज म.फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना मानवंदना म्हणून थोडेसे हे मनातले बोलतेय*

  *आज मुलींना हे जे उच्च शिक्षण मिळतेय ते सर्व सावित्रीबाई व म.फुले या दांपत्यामुळे आहे.आज घरातील एक मुलगी शिक्षित असेल तर ती पूर्ण घरादाराला शिक्षित करते.साक्षर करते.*

  *या फुले कुटुंबियांचे शतशः धन्यवाद आपण सर्व मुली,तरूणी,बायकांनी मानायला हवे आहेत.*

 *एक दीप फुलेंनी पेटविला ज्ञानाचा*

 *सावित्रीच्या अगाध पण होता साथीला*

 *मुलींच्या शिक्षणाचा ठसा उमटवला*

 *आज प्रणाम करू या या दांपत्याला...*


Rate this content
Log in