महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती


एका महाराष्ट्रातच मुळात विविध संस्कृती दडलेल्या आहेत
कोकणातली वेगळी देशावरची वेगळे मराठवाड्यात वेगळी, विदर्भात वेगळी नागपूरची वेगळी एवढेच काय पण पुण्या-मुंबईची पण वेगळी
काय आहे महाराष्ट्रात? असे म्हणण्यापेक्षा काय नाही महाराष्ट्रात? असे विचारणे एकदम योग्य होईल.
कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटलेलेच आहे
या मातीचे कण लोहाचे
तृणपात्यांना खड्ग कळा किंवा
इथे गवताला भाले फुटतात
असा हा आमचा शिवरायांचा विरांचा संतांचा महाराष्ट्र नरड्याची घाटी फुलवून कोणी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर ,ऊर अभिमानाने भरून येतो, नसानसातून लावा उसळून येतो अशी ही महाराष्ट्राची संस्कृती
येथल्या जत्रा यात्रा उरुस तमाशे नाटकं ही महाराष्ट्राची संस्कृती
साधा जेवणाचा पदार्थदेखील किती विविधता
भाकरी बेसन सोबत कांदा आणि लसणाची चटणी हे अस्सल मराठमोळे जेवण बर त्याला नावे तरी किती कुठे पिठले, कोठे झुणका, कोठे गरगटे तर कोठे बेसन सोबत भरलेले वांगे किंवा रसाच्या पाटवड्या अशीही जिभेला हुळहुळायला लावणारी महाराष्ट्राची संस्कृती
कटाची आमटी पुरणाची पोळी चकल्या करंज्या अनारसे ही महाराष्ट्राची संस्कृती कोकणात घावन घाटले विदर्भात मांडे पश्चिम महाराष्ट्रात पुरणपोळी ही महाराष्ट्राची संस्कृती
जगात कोठेही नसलेले व तोटा सोसून देखील निघणारे दिवाळी अंक, ढोलकी चा नाद घुंगराची छम छम डफावरची थाप व शाहिराचे मर्दानी पोवाडे ही महाराष्ट्राची संस्कृती
दशावतारी नाटके, बाल्या नृत्य जाकडी नृत्य कोळी नृत्य लावण्या ही महाराष्ट्राची संस्कृती, साहित्य संमेलन भरवणारी, गुढीपाडव्याला शोभायात्रा काढणारी ही महाराष्ट्राची संस्कृती मराठीमध्येच आमच्या विविध भाषा आहे घाटी, कोंकणी ,अहिराणी आदिवासी ,आग्री, कोळी अशा सार्या तिच्या उपभाषा
आम्हाला राजकारणात फार इंटरेस्ट बेंबीच्या देठापासून कीsssss जय असा ओरडणारा शिर्डी ची पायी वारी करणारा तो मराठी आमच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक
आणि या साऱ्या विविधतेतून एकता साधणारी अशी आमची महाराष्ट्राची संस्कृती