मैत्री
मैत्री


मैत्रीचे फूल
हृदयात उमलत
मनात फुलंत
या फुलाची जपून दोन्ही बाजूंनी करायची असते याच्या पाकळ्या गळू न देणे हे दोघांचे कर्तव्य असते.
मैत्रीचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत बॉलिवूडमध्ये या विषयावर कितीतरी सिनेमे निघालेले आहेत याराना (अभिताभ अमजद) दोस्ताना (अभिताभ शत्रुघ्न) धरमवीर (धर्मेंद्र जितेंद्र) हे त्यातील गाजलेले चित्रपट मग त्यात गरीब-श्रीमंत, प्रेमाचा त्रिकोण, मग मित्रा करता किंवा मैत्रिणी करता त्याग करणे जीवन संपवणे इत्यादी सर्व काही त्यात दाखवत असत .
अगदी मराठीत सुद्धा मुलींच्या मैत्रीवर बिंनधास्त" नावाचा चित्रपट येऊन गेला
पुराणकाळापासून मैत्रीचे दाखले दिलेले आहेत
मैत्री करावी तर दुर्योधन कर्ण यांच्यासारखी मग तो मित्र चुकीचा का असेना पण त्याच्या सुखा-दुखात त्याला साथ देणारा कर्ण
मैत्री करावी तर शंभुराजे आणि कलुषा कब्जी यांच्यासारखी शेवटच्या श्वासापर्यंत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत मित्राला साथ देणारी.
मैत्री असावी तर कृष्ण सुदामा सारखी एक राजा तर एक गरीब ब्राह्मण, पण राजा आपल्या गरीब मित्राला नुसती ओळख देत नाही ही तर त्याची स्वतः सेवा करतो त्याचे आदरातिथ्य करतो आणि जाताना त्याला मालामाल करतो
एक किस्सा सांगतात एका मित्राचं घरदार सारकाही जळून
जातं तो दुसऱ्या मित्राला सांगत असतो यार कुछ भी नही बचा सिर्फ मै बचा, त्यावर तो मित्र त्याला सांगतो "तो यार फिर जलाही क्या है?"
मैत्रीचा अजून एक किस्सा सांगितला जातो एक मित्र सर्व मित्रांना व्हाट्सअप मेसेज करतो यारो चलना है त्यावर त्याचे सर्व मित्र "तू आगे चल हम आ रहे है "असे उत्तर देतात पण त्याला एकहीजण काय? कुठे? कधी ?कशाकरता ?असा प्रश्न विचारत नाहीत
शेवटी पुलंनी म्हटलेल आहेच ना,
रोज भेटावं असं काही नाही .
रोज समाचार घ्यावा असही काही नाही
पण एकमेकाशी मनीचा मनी संवादु म्हणजे मैत्री.
मैत्रीही अतिशय सुंदर भावना आहे एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची वृत्ती त्यात असते निखळ, निकोप ,निस्वार्थी ज्याला वयाचे ,जातीचे, धर्माचे, देशाचे ,लिंगाचे असे कोणतेच भेद नसतात.
तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर
आणि तू तळ गाठलास तर मी तुझ्या अगोदर अशा मैत्रीला खरी मैत्री म्हणतात
ही आज कालची व्हाट्सअप फेसबुक वरची किंवा सोशल मीडियावर ची मैत्री खरी
नव्हे. ते एक आभासी जग आहे फेसबुक वर हजारो मित्र असतात पण वेळेला कोण नाही अशीही मैत्री.
म्हणतात ना संकटात साथ देतो तोच खरा मित्र
मित्राचं मरण परवडलं पण मैत्रीचा कधी मरण होऊ नये
तर मैत्रीत सदैव स्मरण राहावे