Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Lata Rathi

Others


3  

Lata Rathi

Others


मानसी

मानसी

3 mins 754 3 mins 754

 जोशींची मानसी खूप लाघवी, गोड, नाजूक परीच जणू ती. तिचे ते काळेभोर केस, घारे डोळे, मनमोहक हास्य... बघताक्षणीच कुनालाही आपलेसं करणारं व्यक्तिमत्व. मागल्याच वर्षी मानसी पदवीधर झाली....पुढे शिकायची तशी तिची इच्छा होतिच. पण अचानक आत्याच्या नात्यातल एक स्थळ सांगून आलं.... मुलगा मोहित MBBS. MD ...पेशाने डॉक्टर, स्वतःच मोठं सर्वसोयींनी युक्त असं मोठं हॉस्पिटल. इतकं मोठं स्थळ... भाग्य काढलं बाई पोरीन... म्हणून दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

खरतर नकार देण्यासारखं दोन्ही पक्षाकडून असं काही नव्हतंच.लवकरच पसंती झाली. दोन महिन्यांतरची तारीख निघाली. दोघांनी सोबतच खरेदी केली. खूप जय्यत तयारी सुरू होती दोन्ही घरची. एवढयात बातमी पसरली ती चीनमध्ये corona virus पसरल्याची... कितीतरी लोकं मरण पावलीत, संसर्गजन्य रोग....खूप झपाट्याने पसरतोय...सर्वत्र हाहाकार माजलाय ....लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय... डॉक्टरांची कमतरता भासू लागलीय. मोहित एक डॉक्टर म्हणून सर्वतोपरी मदत करत होताच. 


मोहितचा लहान भाऊ "मानस" दुबईला जॉब करत होता, दादाचं लग्न म्हणून तो दिल्लीला यायला निघाला... त्याला तसंही थोडं कणकण वाटत होतंच. एअरपोर्टला चेकिंग करतांना त्याला "corona" डिटेक्ट झालं. सख्खा भाऊ म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून मोहितने मानसवर उपचार सुरू केले, तेही सर्वोतोपरी खबरदारी घेऊन... मानसची तब्येत सुधारायला लागली...पण मोहितला मात्र संसर्ग होऊन तो corona virus ला बळी पडला. मानसीला खूप मोठा मानसिक धक्का बसला. तिने एकदम अबोलाच धरला, ती कुणाशीच बोलत नसे. शून्यात नजर हरवून बसलेली रहायची नुसती... चेहरा पार उतरून गेला होता. मानसी आणि मोहितचं नातं नवीन बंधनात बांधण्याआधीच संपलं होतं... पण म्हणतात ना "लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात"... तसंच काहीसं मानसीच्या बाबतीत घडलं. 


एकदा मानसीचा दीर मानस तिला भेटायला म्हणून आला. तशी मानसी मानसपेक्षा एका वर्षाने लहानच. त्याला पाहून ती खूप रडली. मानसला पण खूप वाईट वाटलं... मी वाचलो...पण...पण ....मला वाचवताना माझ्या भावाने स्वतःचे प्राण गमावले... मीच कारणीभूत त्याला... ते काहीही असो... मी मात्र एक निर्णय घेणारच... मानसने मनोमन निर्णय घेतला... मोहितची जीव की प्राण असणारी "मानसी"....तिला मात्र आता मी जपणार. त्याने सरळ मानसीलाच प्रश्न केला,"मानसी...मी सरळ सरळच विचारतोय, लग्न करशील माझ्याशी" मी माझ्यासाठी नाही तर, मोहितच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुला विचारतोय. खूप स्वप्नं पाहिली होती, त्याने तुझ्यासोबतची. तू आमच्या घरात येणार म्हणून तो खूप खुश होता. त्याचं स्वप्न आपण साकारू या... मला माहिती आहे, "तुला खूप कठीण जाईल त्याला विसरणं" मला आणि असंख्य रुग्णांना वाचवताना त्याने स्वतःचं बलिदान दिलं... त्याचीच परतफेड म्हणून मी तुला मागणी घालतोय. दुसऱ्या घरची सून न होता तू आमच्याच घरची सून हो. खूप खुश होईल दादा... मी तुझ्यावर कसलंही बंधन घालत नाहीये... तू विचार कर आणि मगच सांग मला...


मानसीने घरी आईबाबांना सांगितले. त्यांनीसुद्धा निर्णय तिच्यावर सोडला... मानसी आपल्याच विचारात गुंग होती... खाली होळी मिलन... रंगपंचमीचा कार्यक्रम सुरू होता... डीजेवर गाणं वाजत होतं... "होली के दिन दिल खिल जाते हैं....रंगों मे रंग मिल जाते हैं... तिचं लक्ष खाली गेलं.. .मानस हातात गुलाल घेऊन उभा होता... पण मानसीला मात्र त्याच्या रुपात मोहीत दिसत होता, जणू तो तिला डोळ्याच्या इशाऱ्याने खुणावून बोलवत होता... मानसी सावकाश... मंदगतीने खाली उतरली... दोन्ही मुठी भरून गुलाल हातात घेतला... आणि वर उधळला... मानसने पण गुलाल हातात घेऊन तिच्या गालावर गुलाल लावला...


तिने उधळलेल्या गुलालाच्या सप्तरंगी रंगामध्ये जणू मोहीत हसत हसत त्या दोघांना आशीर्वाद देत होता... आणि परत दुसरं गाणं सुरू झालं...


"नको मारू रे कान्हा पिचकारी

साडी रंगानं भिजल माझी सारी"


Rate this content
Log in