Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

माणुसकी

माणुसकी

2 mins
158


माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच तर माणुसकी बरोबर न!


पूर्वी माणूस एकमेकांच्या मदतीला अगदी धावून जायचा. एकी दिसून यायची. पैसा, शारिरीक श्रम, एकमेकांची मुले सांभाळणे, घरात अन्न कमी पडले की त्याचे दातृत्व, एवढेच काय माणूस गेला तरी त्या घरातील चूल कमीतकमी दहा दिवस पेटत नसे. अशावेळी शेजारी पाजारी, नातेवाईक अन्नपदार्थ पुरवायचे.


पण... हल्ली हे सारे दिसत नाही. शहरात तर नाहीच नाही. कदाचित गावाकडे या प्रथा दिसतीलही पण खरंचंच हल्ली माणुसकी लोप पावताना आपण पाहत आहोत.यात आपण सारे येतो.


हल्ली कोणाला कोणाकडे जायलाही वेळ नाही. फक्त सण, समारंभ, मयत याच गोष्टींसाठी शहरातील माणसे एकत्र येतात. ती पण वेळ असेल तरच... हो.. खरं आहे हे. आजकाल माणूस यंत्रमानव झालाय हो. सर्व काट्याच्या घड्याळाप्रमाणे आपण जीवन जगत आहोत.


कोरोनाच्या या काळात खूप वर्षांनी लाॅकडाऊनमुळे आपण आपल्याच मुलांशी मनसोक्त खेळलो. त्यांना वेळ दिला. आपल्याच सासू सासर्‍यांशी नव्याने ओळख करून घेतली. त्यांनाही वेळ दिला. पुरूषांनी आपल्या आईबाबांसाठी वेळ दिला. बायकोला वेळ दिला.


बायकांनी, विशेषतः नोकरी करणार्‍या बायकांनी आपल्या कुटुंबासाठी वेगवेगळे पदार्थ नेटवर सर्च करून बनविले. कुटुंबात रमायला वेळ नव्हता तो वेळ यांना मिळाला.


पण ज्या घरातून आयटीवाल्यांचे job सुरू होते. अशांनी देखील घरात एकमेकांना मदत करत कामांची पूर्तता केली.


आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस, डाॅक्टर, शिक्षक, विविध सेवा देणार्‍या संस्था अशा अनेकांचे माणुसकी पणाचे दर्शन याच काळात झाले.


काही ठिकाणी माणुसकीचा लवलेशही दिसला नाही. कारण आपल्याला कोरोना होईल बाबा! ही भीती.


तररर अशी ही माणुसकी.माणुसकी म्हणजे कोणत्याही परत मदतीची अपेक्षा न ठेवता फक्त मदत करत राहणे.


रस्त्यात Accident झाला तर त्या माणसाची मदत करणे. वृद्धांची काळजी घेणे. आणखी काय असते हो जीवनात...एवढे जरी जपले तरी माणुसकीचे दर्शन होईल...


चला तर माणुसकिचा विडा आपण सारे मिळून उचलूया.


Rate this content
Log in