Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

माणुसकी

माणुसकी

5 mins
237


   हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना.....

  ही प्रार्थना का म्हणावी लागते बरं माणूस जर माणसाशी माणसाप्रमाणे वागला तर काय होईल ?असे अनेक प्रश्न मनामध्ये येतात.

    पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्या कुटुंबामध्ये आजी-आजोबा, आई- बाबा ,मुलं ,काका - काकी, एवढेच नव्हे तर पणजी- पणजोबा सुद्धा एकत्र असायचे.

   हल्ली हे एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळत नाही पूर्वी सर्व एकत्र असल्याकारणाने सर्व मुलांवरती म्हणजेच या लहान, लहान मुलांवरती बोधकथा ,संस्कार कथा सांगितल्या जायच्या.रात्री आजीजवळ झोपायचे. आजीची रामायण,महाभारतातील गोष्ट ऐकायची यातून मुलांवरती संस्कार होत असायचे .मुलं वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवत असायची त्यांना मान द्यायची .सकाळ सांजसमयी देवापुढे दिवाबत्ती असायची. शुभंकरोती म्हटले जायचे. आणि मुलांना आपसूकच सर्व मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचे गुण घेतले जायचे आणि छान मुलं घडायची. त्यामुळे एक व्हायचं की कुटुंब एकत्र असल्याने मुलं उलट उत्तर देत नव्हती. एकमेकांची मारामारी होत नव्हती त्याच बरोबर घरामध्ये एकत्र भावंडे वाढल्याने आपुलकी, प्रेम ,माया वाढीस लागायची आणि त्यामुळे सर्वजण एकमेकांशी एकसंघ बांधले जायचे एकाला दुःख झालं की दुसरा दुःखी व्हायचा एकाला सुख मिळालं की दुसरा त्यात सुखी असायचा. म्हणजेच काय तर थोडा जरी कोणाला लागलं तरी आख्ख घर रडवेल व्हायचं आणि कोणी नुसते पास झाला तरीसुद्धा त्या घरामध्ये एक वेगळा आनंद निर्माण व्हायचा.         शेतकरी कुटुंब असेल तर शेतकरी कुटुंबामध्ये सुद्धा शेतातले पीक अन्नधान्य येणारे प्रमाण , जोमानं वाढणारी पिकं या सर्वांवरती एकमेकांचा एकोपा टिकून होता . आनंद व्हायचा.घरातील सर्वजण एकत्रीत कामे करायची.

   आज-काल ही एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळत नाही. घरातल्या सुनांना सासू नको आहे की सासूला सुनांचे वागणं पटत नाही. त्यामुळे काय होतंय की पूर्णतः समाजाची बांधिलकी सोडून एकत्र कुटुंब पद्धती पूर्ण उध्वस्त झालेली आहे सासु सुनांच्या या भांडणांमध्ये ,या वैरामुळे ,या वादामुळे घरातील लहान लहान मुलांवरती संस्कार म्हणून दूर होत चालला आहे आणि मग मुलगा फक्त बायकोला घेऊन बाहेर पडतोय आईवडिलांकडे पहात नाही व अशा वेळेला आई वडिलांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे आणि जरी वृद्धाश्रमाची त्यांनी आधार घेतला तरी वृद्धाश्रमामध्ये त्यांची जपणूक नीट होईल की नाही हे सांगता येत नाही. त्याचबरोबर या लहान लहान मुलांवरती आई-बाबा दोघेही कामाला जातात त्यांना पाळणा घरात राहावं लागतं आणि या पाळणाघरात राहिल्यानंतर ह्या मुलांवर अशी किती शिस्त लागणार आहे.कितीस प्रेम त्यांना मिळणार आहे ,किती माया मिळणार आहे आणि त्यांना खरंच शिस्त लागणार आहे का ?त्यांना बोधकथा, संस्कार कथा सांगितल्या जाणार आहेत का? तर या सर्वांचा विचार केला असता ही मुलं एकटी पडतात. एकलकोंडी होतात. मग काय आजकाल मोबाईल हातात देऊन मुलांना शांत करणे. मोबाईल हातात देऊन मुलांना खायला घालणं. मोबाईल हातात देऊन मुलांना शांत करून तासनतास त्याकडे मुलं छान बघत राहतात आणि मग आई-वडील आपापली काम करत राहतात योग्य आहे का हे ? अजिबात नाही पण करणार काय घरात मुलांना सांभाळायला कोणी नसतं .एकटी आई ती संसारासाठी काम करते बाबा कामच करतात .दिवसभर ड्युटीवर जातात .आई दिवसभर ड्युटीवर जाते. दोघेही नवरा बायको कामामध्ये व्यस्त आहेत मग मुलांकडे पाहणार कोण तर मुलांना हे मोबाईलचा वेड लावून पालक शांत बसतात कारण त्यांना सुद्धा हेडक झालेला असतो. दिवसभर कंपनीमध्ये काम करून स्वतःसाठी त्यांना जगण्यासाठी वेळ मिळत नाही तर यातूनच माणुसकी कमी झालेले आपल्याला दिसते. माणूस चालताना पडला तर त्याला उचलायला कोणी नाही पूर्वी असं नव्हतं माणूस पडला असता त्याला दहाजण लोक उचलायला पटकन यायची .आता काय होतंय माणुसकी हरवलेली आहे.  या माणुसकीने हपुढे येवून माणसाला वाचवले तर, माणुसकीन जपणारा एखादा आला तर मग पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो मग त्याला कोण तोंड देणार. इत्यादी अनेक प्रश्न निर्मिती आपल्यासमोर येते आणि मग यातूनच पुढे माणुसकी लोप पावलेली दिसते. आपण पाहत आहोत माणूस रस्त्याला जातोय त्याचा ॲक्सीडेंट होतो चार लोक धावतात त्याला उचलतात बाजूला ठेवतात आपापल्या मार्गाने निघून जातात पोलीस येतात पंचनामा करतात जगला असेल तर त्याला समजून सांगून त्याला पाठवून देतात. आणि गेला असेल तर त्याच्यावर पंचनामा करून त्याच्या घरच्यांना सांगितले जाते ही माणुसकी आहे का हो .आपल्या सगळे डोळ्यांना दिसतय आणि माणुसकी अजिबात नाही मग काय माणुसकी हरवली का बर माणुसकी हरवण्याचा एकच कारण आहे आत्ता आपण जे गुंतत चाललंय खूप कामात अडकत चाललंय. स्वतःसाठी आपल्याकडे वेळ नाही मुलाबाळांसाठी आपल्याकडे वेळ नाही आपल्या आई वडिलांची बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. वेळ कशासाठी आहे वेळ आहे आपली स्वतःची काम करण्यासाठी, वेळ आहे आपल्या कामांमध्ये अनेक आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी, वेळ आहे फक्त आणि फक्त कंपनीसाठी, वेळ नाही कुटुंबासाठी वेळ नाही आई-वडिलांसाठी वेळ नाही मुलाबाळांसाठी ,आणि मग यातूनच आपोआप माणुसकी हरवत चाललेली आपण पाहतो माणुसकी नाही असं नाहीये माणुसकी आहे माणसांमध्ये माणुसकी अजूनही पाहू शकतो आपण पण काय होतंय या अनेक समस्यांना तोंड देता देता माणूस स्वतःला शोधतोय.प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय खरंच आपणच आपल्याला शोधतोय आपणच माणसातला माणूस शोधतोय .आणि माणसातले माणुसकी हरवलेली शोधण्याचं काम सुरू झाले. पण ते कुठे थांबेल सांगता येत नाही आणि म्हणून ही प्रार्थना माणसाने माणसाशी माणसासम वागणे .आपण हल्ली किती क्रूर हत्या करताना पाहतोय आता कालची बातमी पाहा. पिंपरीतल्या एकाच बिल्डिंग मधल्या एका छोट्याशा मुलाला क्लोरोफॉर्म देऊन त्याला बेशुद्ध करण्यात आलं त्याला क्लोरोफॉर्म जास्त झाला आणि मग त्याला पोत्यात घालून ठेवण्यात आलं की त्याचा श्वासही कोंडला.  केवढं क्रूर ही हत्या त्याच्याच बिल्डिंग मधल्या दोन मुलांनी केलेले हे कर्म काय म्हणावं ही माणुसकी आहे का? छोट्या मुलाला काही करतांना यांना काही वाटलं नाही का काय बघा म्हणजे हे माणुसकी नाही ,माणुसकी हरवली या पूर्ण समाजामध्ये माणुसकी हरवली माणुसकीला आता काहीच नाहीये पण कितीही म्हटलं की माणुसकी आहे पण नाही माणुसकी पूर्ण उद्ध्वस्त झालेली दिसते. आपल्याला लोक प्रत्यक्ष या समोर येऊन गोळ्या घालतात प्रत्यक्ष समोरून तलवारी चालवतात. समोरून चाकूने हल्ला करतात .काय रे हे बापरे माणुसकी नाही माणुसकी नाही ही हे क्रूर हत्या करणारी ही क्रूर लोकं यांच्यामध्ये काय माणुसकी जिवंत असणार आहे ज्यांच्याकडे माणुसकी जिवंत आहे ना तो या जगात टिकत नाही. शंभर टक्के टिकत नाही .जो म्हणतो ना पूर्वपार म्हण आहे

   "जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला "त्याप्रमाणे देव माणुसकी असणाऱ्या लोकांना लवकर वर घेऊन जातोय त्याला ह्या जगातच स्थान नाही . देवाला माहिती आहे की हा माणूस या समाजात टिकणारा नाही. बरोबर अशा चांगल्या लोकांना तो वर घेतो .आणि अशी काही उदाहरण आहेत की खरंच माणुसकी आहे. माणुसकी जपणारे लोक आहेत अजूनही या जगामध्ये आहेत पण अगदी 20% लोक या जगामध्ये माणुसकी जपणारे आहेत तर 80 टक्के लवकर हे माणुसकी न जपणारी आहेत .तर याच्यामुळे काय होतंय माणसाला माणसाशी कसं वागावं ?हेच कळत नाहीये माणूस माणसाशी प्रेमाने बोलायला जातो मायेनं बोलायला जातो पण त्याच्या आतमध्ये अंतरात कसले प्रवाह होता ते माणुसकीचे की विषाचे हे आपल्याला समजत नाही आणि ते समजेपर्यंत समोरचा माणूस आपला घात करून निघून गेलेला असतो अशी ही आगळीवेगळी माणुसकी.......

  माणुसकी माणुसकी म्हणजे तरी काय हो एकमेकांच्या मदतीला येणे. एकमेकांवर माया करणं ,संकट समयी उपयोगी येणं, कोणाला त्रास झाला असेल तर त्याला त्याचा त्रास कमी कसा होईल हे पाहणं, मदत, प्रेम ,माया ,आपुलकी याच शब्दांना धरून माणुसकीचे कार्य पूर्ण होते. माणसाने माणसाशी प्रेमाने वागाव, फक्त एवढीच अपेक्षा आहे त्याला वेळेला मदत करणे हीच अपेक्षा आहे..

 माणूस म्हणून जन्म जाहला

 माणसांप्रमाणे जीवन जगू या

 प्रेमाचे दीप प्रज्वलीत करू या

 रंजल्या ,गंजलेल्यांना मदतीचा हात  देवू या


Rate this content
Log in