माझी वाईट सवय
माझी वाईट सवय
मला फार पटकन राग येतो मला माझ्या रागावर ताबा मिळवायचा आहे. मला एखाद्या गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया द्यायची सवय आहे. माझी बात सत्य असते कधीकधी समोरचा खोटा असतो पण माझ्या झटपट देण्याच्या प्रतिक्रियेमुळे काही माणसे दुखावली जातात. त्यात माझा काही स्वार्थ नसतो कधीकधी ज्याच्यावर अन्याय होत असतो त्याच्या बाजूने मला समोरच्याशी भांडण्याची सवय आहे. मला कोणी कायदे मोडलेले आवडत नाहीत. मी स्वतः देखील कायदे पाळते, सामाजिक बंधने पाळते मग ती दुसऱ्याने मोडली तर मला राग येतो व मी समोरच्या व्यक्तीला ताबडतोब जाऊन त्याविषयी बोलते. उदाहरणार्थ उदाहरण कोणी सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकले, उगाचच फोनवर बोलता बोलता सार्वजनिक ठिकाणी शिव्या दिल्या, रस्त्यात गाडी आडवी लावली, उगाचच एखाद्या विषयी खोट्यानाट्या अफवा पसरवल्या तर मला तेथे राग येतो आणि मी सार्वजनिक ठिकाणीदेखील भांडायला ऊठते.
एक उदाहरण सांगते आमच्या लग्ना मधून अजून एक लग्न ठरले मुलगी यांची बहीण लागत होती , तर मुलगा माझ्या नात्यातील होता. या
दोघांचे लग्न झाले आणि साधारण दीड वर्षातच त्या मुलीने सुसाईड केले राजाराणी दोघेच राहत होते पण ती थोडी स्वभावाने विक्षिप्त होती शिवाय तिला फीट्स येत होत्या पण मुलाची किंवा त्याच्या आई-वडिलांची काही चूक नसताना मुलीची आई मुलीच्या प्रेता पाशी तिच्या नवर्याला आणि सासु-सासर्यांना उगाच शिव्या देत होती. शेवटी माझ्याने रहावले नाही मेलेली मुलगी नात्याने माझी नणंद लागत होती मी सगळ्यांसमोर तिच्या आईला म्हणाले कशाला उगाच तिच्या सासरच्या माणसांच्या नावाने ओरडता तुमची मुलगी चार चार महिने माहेरीच राहत होती आणि तिने स्वतःच्या हाताने करून घेतलेले आहे तिला कोणी त्रास वगैरे दिला नाही माझी बाजू खरी होती परंतु माझ्या ताबडतोब प्रतिक्रिया देण्याच्या स्वभावामुळे त्या कुटुंबाशी आमचे संबंध संपले शिवाय घरी आल्यावर सासूबाईंचा ओरडा खाल्ला तो वेगळाच अशी कितीतरी उदाहरणे आहेत यामध्ये मी समोर त्याच्या तोंडावर जे काही बोलायचं ते बोलते वास्तविक इतर मंडळी पाठीमागे बोलत असतात मला ते जमत नाही या माझ्या स्वभावामुळे माणसे दुखावली जातात.