STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Others

2  

Mrs. Mangla Borkar

Others

माझी प्रिय आई

माझी प्रिय आई

2 mins
157

जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे. माझ्या आईच नाव " विमला शंकर गराडे " माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.


माझी आई एक गृहीणी आहे. घरात सर्व प्रथम आईच उठते. ती मला दररोज लवकर उठवते. मला उठवतांना ती प्रेमाने हात फिरवते. तिचा स्पर्श ,तिची येन्याची चाहूल नकळत समजते. मला चांगल्या सवयी लावते.मला शिकवते. चूकल्यावर शिक्षा करते . मी माझ्या आईमूळे यशाच्या पायरीवर पुढे चढते. त्यात यशात माझ्या आईला श्रय देते. माझी आई माझ्या साठी खूप मेहनत करते. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. 


आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.


शाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यामदे काही अडचण असेल तर सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसेल तर रात्रभर जागून आपली देखबाल करणारी आईच असते. स्वताचा घास न खाता आपल्या मुलांना देणारी वेक्ती म्हणजे आईच असते.


आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.


माझ्यासाठी माझी आईच माझ सगळ काही आहे, तीच माझा देव आहे. संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आईवर. तिची माझ्या वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणार पहिला शब्द म्हणजे “आईग”. मला मझी आई खूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.


आईचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. त्‍यामुळे माझी आई माझा आदर्श आहे.


    प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असेल, महत्त्वाची भुमिका असेल तर ती "आई" . आई हा शब्द किती सोपा आहे, परंतु त्या शब्दामागे लपलेले तिचे प्रेम, माया, करूणा, हे सांगतांना शब्द संपतील ,हे सांगणें कठिण आहे.


Rate this content
Log in