Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

माझी भिती

माझी भिती

1 min
664


भीती हा प्राणिमात्राचा स्थायीभाव आहे. प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटत राहते ,इतर प्राण्यांना  भय, भूक आणि मैथुन इतकेच माहित असते. आणि मनुष्यप्राण्याला त्यात अजून बुद्धी दिलेली असते भितीला शास्त्रोक्त भाषेत anxiety शब्द आहे सर्वसामान्य माणसांना पाल, झुरळ, साप ,कुत्रा, मांजर याची भीती वाटत असते .तर व्यापारी उद्योगपती यांना धंदा गडगडण्याची भीती वाटत असते. राजकारण्यांना आपले पद जाण्याची भीती वाटते .कोणाला उंच जागेची ,कोणाला भुताची ,कोणाला अज्ञात संकटाची भीती वाटत असते. तर मरणाची भीती ही साऱ्यांनाच वाटत असते

मला नेहमी उंचीची भीती वाटते उंच डोंगरावर गेले तर आपण तोल जाऊन खाली पडू असे वाटते तसेच गुहा , खबदाड, अरुंद जागा अशा ठिकाणी मला गुदमरण्याची भीती वाटते .

मला नेहमी अज्ञात संकटाची भीती वाटत असते .माझ्या मुलांना नवऱ्याला काही होईल का याची भीती वाटत असते .म्हणतात ना "मन चिंती ते वैरी न चिंती" मला भारत देशाच्या भविष्याची भीती वाटते. मला लोकसंख्येचा विस्फोट झाला तर भारतात माणसांना अन्न मिळेल का? याची भीती वाटते या देशाचे इस्लामीकरण होईल याची भीती वाटते. आई-वडील दोघेही मरणापूर्वी अंथरुणाला खिळलेले होते, त्यामुळे मला पण आजारपणाची भीती वाटते व आपल्या म्हातारपणी तशीच अवस्था आपली होईल का ?आपल्याला मूले बघतील का? अशा अनेक अज्ञात संकटांची मला भीती वाटत असते


Rate this content
Log in