माझे लेखन
माझे लेखन


लेखन हे उस्फूर्तपणे येते. ती मनाच्या तळातून येणारी उर्मी असते आणि त्याला काळ वेळ देखील नसते. डोळे मिटून झोपताना बरोबर शब्द आणि यमक सापडतात. त्यामुळे जशी कलावंताची कला त्याला उत्स्फूर्त असते. तशीच लेखन हीसुद्धा एक उत्स्फूर्त गोष्ट आहे. तरी पण प्रेरणा म्हणाल तर त्या काळातले मराठीतले दिग्गज ग दि माडगूळकर, वि वा शिरवाडकर या लोकांची प्रेरणा मिळाली त्यांच्या कविता आजही तोंडपाठ आहेत पहिली कविता मी इयत्ता पाचवीत असताना केली. ती पण अतिशय गंभीर विषयावर त्या वयात मला त्यातले काही कळत नव्हते त्या वयात मी खालील कविता केली
वृद्धांना या जगात ना थारा
जगा क्षणाचा पसारा
पिकलेले पान
ते ही तरु पासून वेगळे
तसेच हे सारे वृद्ध
जगापासून वेगळे
कोणी न देते त्यांना थारा
जगा क्षणाचा पसारा