Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vasudha Naik

Others


1  

Vasudha Naik

Others


माझे लाडके पुस्तक

माझे लाडके पुस्तक

1 min 259 1 min 259

डाॅ. रमा मराठे यांनी लेखन केलेले "ब्रेम प्रोग्रॅमिंग" हे पुस्तक मला खूप भावले. कारण यात आपण जसे विचार करतो, तसेच होते. मग आपण आपला ब्रेन प्रोग्रॅमिंगच असा करायचा की हवे ते साध्य कसे करता येते. हे या पुस्तकात समजावून सांगितले आहे.

   

आपले मन आपल्याच हातात असते. आपल्या जीवनातील अनुभवांना आपणच जबाबदार असतो. आपणच आपलं भविष्य घडवतो. यावर खूप छान लेखन केले आहे.

  

हे प्रोग्रॅमिंग कसं होतं?

प्रत्येक माणूस त्याच्या ब्रेनशी सुसंगत वागतो. तो विसंगत वागूच शकत नाही. हे खरं अथवा खोटं असू शकतं. हे परिस्थितीला पूरक असेलच असे नाही. हे छान उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे.

  

हे ब्रेन प्रोग्रॅमिंग बदलतं तेव्हा खरंचंच चमत्कार घडतात. जीवन नक्कीच १८० डिग्रीने बदलते.

  

आपला आपणाशी सुसंवाद म्हणजे ब्रेन प्रोग्रॅमिंग... यामुळे असाध्य ते साध्य होण्यास मदत होते. विज्ञानातील अशी अनेक उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे.

   

आपला मेंदू म्हणजे अफलातून संगणक आहे. यात प्रत्येक कामासाठी एक प्रोग्रॅम फाईल असते. पाॅझिटिव्हवर निगेटिव्ह विचार कुरघोडी लवकर करतात. यासाठी हे निगेटिव्ह विचारांचे प्रोग्रॅमिंग बाजूला हटवून पाॅझिटिव्ह प्रोग्रॅमिंगवर कुरघोडी करता यायला हवी.

  

रोजच आपण 'हिप्नोटाइज' कसे होतो. हे छान समजून दिले आहे. 'तूच आहेतुझ्या जीवनाचा शिल्पकार' या उक्तीप्रमाणे या पुस्तकात आपले विचारच कसे घातक असतात, तेच कसे चांगले होऊ शकतात. हे उत्तम सोदाहरण सांगितलेआहे. त्या मुळे आपण जगात वावरताना कसे वागलो पाहिजे यातून समज मिळते. आणि हो छान विचारांची मशागत करण्यास खूप मदत होते. प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे.


Rate this content
Log in